शिरपूर तालुक्यातील पारशिपाडा येथे लुपिन ह्युमन वेलफेअर अण्ड रिसर्च फाउंडेशन धुळे याच्या अंतर्गत राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा





शिरपूर तालुक्यातील पारशिपाडा येथे लुपिन ह्युमन वेलफेअर अण्ड रिसर्च फाउंडेशन धुळे याच्या अंतर्गत राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे लुपिन फाऊंडेशन चे पोजेक्ट मॅनेजर  श्री. राऊत सर व प्रकल्प व्यवस्थापक श्री सुनील सैंदाणे व प्रशिक्षक समन्वय श्री कुशावर्त पाटील व पि  यु व्यवस्थापक श्री सुर्यकांत तावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काय्रक्रम घेण्यात आला.कृषि मित्र सजैराव पावरा यांनी सांगितले की देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग हे स्वता. शेतकरी कुटुंबातील होते. त्याचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी झाला स्वता शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकर्यांचे समस्या व परिस्थिती ची चांगली जाण होती. त्यामुळे त्यांनी शेतकर्यांना साठी भरीव कामगिरी केली. चरणसिंग हे फार कमी काळ पंतप्रधान असतानाही त्यांनी भारतीय शेतकर्यांना साठी कठोर परिश्रम घेतले. त्याच्या या योगदानाबद्दल सन 2001 मध्ये सरकारने चौधरी चरणसिंग याचा वाढदिवस शेतकरी दिवस  म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून राष्ट्रीय शेतकरी दिन हा 23 डिसेंबर रोजी भारत भर साजरा केला जातो. असे या वेळी सागितले. व लुपिन ह्युमन वेलफेअर अण्ड रिसर्च फाउंडेशन मार्फत शेतकर्यांना साठी राबविल्या जाणार्या विविध शेती विषयक योजना  विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. व  पारशिपाडा येथील शेतकरी राधेश्याम पावरा यांनी शेतकरी दिवसा निमित्ताने त्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लुपिन फाऊंडेशन चे कृषि मित्र. सजैराव पावरा व अनिल पावरा यांनी यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने