नाशिक=निफाड तालुक्यातील गावा-गावांत मटका धंद्यानी कळस गाठला असून कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक मात्र याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष्य करीत आहेत.त्यामुळे स्थानिक महिला व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
अवैध मटका व्यवसायात नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक म्हटला तर निफाड तालुका या तालुक्यात अवैध मटका,जुगार जोरात सुरु असून नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा मात्र ढिम्मच आहे.या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मटका, पत्ते जुगार मोठ्या प्रमाणात सुरु आहे.या अवैध धंद्यामधून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.हि आर्थिक कमाई कुणाच्या तिजोरीत अथवा खिशात जात आहे अशी चर्चा गावांत रंगत आहे.मटका,जुगार अड्डे मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील बहुतांशी नागरीक विशेषतःतरुण वर्ग नादाला लागला आहे.महिलांना पतीला तर काही महिलांना मुलांना सांभाळावा की संसार करावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.मटका,जुगार खेळण्यासाठी पैसे घेण्यासाठी पती मारहाण करतात तर मुले दमदाटी करतात व मटका, जुगार अड्ड्यावर दिवसभर केलेल्या रोजंदारीचे पैसे हिसकावून उधळवून येतात. त्यामुळे या परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावे.सकाळ ते संध्याकाळ पर्यंत येथे जुगाऱ्यांची गजबज असते.बऱ्याचदा भांडणेही होतात.याचा त्रास परिसरातील रहिवाशांना होतो.संबंधितांना पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नसून पोलिसांना अशा प्रकारच्या व्यवसायाची कल्पनाच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल.पोलिस यंत्रणेकडून कायद्याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक हे शिस्तप्रिय आहे परंतु त्यांचे शिलेदार मात्र तालुक्यात मटका, जुगार पत्ते तिरट,सोरट या अवैध व्यवसायास बिनबोभाट सरकारी परवानगी असल्यासारखी परवानगी देऊन लतखोरी करत आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या गंभीर व्यवसायाची व लतखोरी करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून कारवाई करावी.पोलिसांकडून एखाद्या मटका,जुगार अड्ड्यावर मॅनेज थातूरमातुर कारवाई होते.नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस प्रशासन अवैध मटका,जुगार अड्ड्या विषयी अनभिज्ञ आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे.येथील मटका,जुगार चालक मुजोर झाले असून त्यांना कुणाचाही धाक राहिला नाही.तालुक्यात किमान तीसच्यावर मटका जुगार अड्डे आहे.या एका मटका अड्डयाची दैनंदिन उलाढाल लाखोंच्या पुढे असल्याचे सांगितले जाते.हे धंदे पोलिसांच्या आशीर्वादा शिवाय चालू शकत नाही.या अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर नाशिक परीक्षेत चे पोलिस बी, जी,शेखर व नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सिंघम स्टाईलने यांच्या मुसक्या आवळल्या परंतु नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस यंत्रणेकडून पूर्ण पणे ढिल्ल्या केल्या.नाशिक ग्रामीण पोलिस व स्थानिक पोलिसांना या अवैध धंद्यांविषयी काही ही माहिती नाही असं म्हणणं म्हणजे जिकरीचे ठरेल.
बहुतांशी नागरिक दिवसभर काबाडकष्ट करून मिळालेले पैसे या मटका व्यवसायिकांच्या हवाली करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र आहे.
निफाड तालुक्यातील हे सर्व अवैध धंदे दिवसा ढवळ्या राजरोसपणे सुरु असून ते पोलिस आशिर्वादाने सुरु असूच शकत नाही,अशी चर्चा सामान्य मजुरी करणारी महिला व नागरिकांत दबक्या आवाजत व आमची नावे छापू नका अथवा सांगू नका अशी विनंती करत त्यांनी ही माहिती दिली.