ईश्वर बोरसे यांना राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार प्रदान



शिरपूर : येथील दैनिक समाजशक्ती व एस टीव्ही न्यूजचे संपादक ईश्वर रतिलाल बोरसे यांना सोलापूर येथील ईगल फाऊंडेशनतर्फे झालेल्या राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार वितरण सोहळ्यात उत्कृष्ट संपादक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंढरपूर (जि.सोलापूर) येथील सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार रामहरी रुपनवर यांच्याहस्ते ईश्वर बोरसे यांनी पुरस्कार स्विकारला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विलास कोळेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. ईश्वर बोरसे अनेक वर्षापासून पत्रकारितेत सक्रीय असून प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्षदेखील आहेत. पुरस्काराबद्दल ईश्वर बोरसे यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे महाराष्ट्र परिट धोबी समाजाचे प्रदेश अध्यक्ष एकनाथराव बोरसे, यांच्यासह जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात आले. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने