स्व. हेमंतबेन (मम्मीजी) पटेल मेमोरियल आय हॉस्पिटलचे दि. 31 डिसेंबर रोजी भूमिपूजन





शिरपूर : रसिकलाल पटेल मेडिकल फाउंडेशन शिरपूर संचलित स्व. हेमंतबेन (मम्मीजी) रसिकलाल पटेल मेमोरियल आय हॉस्पिटलचे दि. 31 डिसेंबर 2021 रोजी भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे आमदार काशिराम पावरा व रसिकलाल पटेल मेडिकल फाउंडेशन चे उपाध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या शुभहस्ते तसेच धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषारभाऊ रंधे, आनंद गुजरात येथील शंकरा आय हॉस्पिटलचे युनिट हेड डॉ. किशोर इसई यांच्या प्रमुख उपस्थितीत, शिंगावे गटाचे जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील, करवंद गण पंचायत समिती सदस्य यतिष सोनवणे, आमोदे येथील सरपंच सौ. हर्षालीदेवी रविंद्रसिंग देशमुख, उपसरपंच सौ. लतादेवी योगेंद्रसिंग राजपूत यांच्यासह शिरपूर शहर व तालुक्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन कार्यक्रम संपन्न होत आहे.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शिरपूर शहर व तालुक्यात सर्वच क्षेत्रात मनापासून उत्तम कामगिरी होत आहे. रसिकलाल पटेल मेडिकल

फाउंडेशन मार्फत अनेक वर्षांपासून शिरपूर तालुक्यातील नागरिकांसाठी नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे मोठ्या प्रमाणात करण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. आनंद (गुजरात) येथील शंकरा आय हॉस्पिटल यांच्याशी करार व संपर्क करुन येथे शिरपूर तालुक्यातील नेत्र रुग्णांना पाठवून मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात आले आहेत. यासाठी प्रयत्नाने आतापर्यंत 28 हजार पेक्षा जास्त नेत्र रुग्णांची तपासणी झाली असून 18 हजार पेक्षा जास्त रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तसेच 22 हजार पेक्षा जास्त रुग्णांना मोफत चष्मे वाटप आतापर्यंत करण्यात आले आहेत.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने