निफाड येथील पत्रकार यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईची मागणी अखिल भारतीय प्रसार माध्यम पत्रकार संघातर्फे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी. नाशिक शांताराम दुनबळे.



        नाशिक:- निफाड येथील पत्रकार निफाड टाइम्स चे संपादक सुरेश अहिरे यांच्यावर टाकळी विंचूर गावातील सार्वजनिक  वाचनालयात काही समाजकंटकांनी केलेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी त्याचप्रमाणे त्यांच्या आई वडिलांना देखील मारहाण करण्यात आली  हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघ मालेगाव यांच्यातर्फे देण्यात आले 
       सुरेश अहिरे हे पत्रकार आहेत एका  पत्रकारावर हल्ला करून त्याचे त्याचे आई- वडिलांना मारहाण करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केलेला असताना उलट लासलगाव पोलिसांनी त्यांना  अपमानास्पद वागणूक  दिली  त्या  पोलिस अधिकारी कर्मचारी यांची चौकशी  मागणी यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी तालुका अध्यक्ष रमेश मोरे नागेश मोरे जिल्हा संघटक सिद्धार्थ शेजवळ कार्याध्यक्ष मुस्ताक अहमद कमालुद्दीन उपाध्यक्ष विठ्ठल घुसळे सचिव दीपक उशिरे विशाल मोरे आदी उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने