दोंडाईचा - कृ. ऊ.बा. समितीचे माजी सभापती स्व. इंद्रसिंग बापु यांचे नातू, समितीचे लिपिक दिवानसिंग ठाणसिंग राजपुत यांचे चिरंजीव, सध्या डी.एम.जी. हाय. व ज्युनिअर कॉलेज विसरवाडी येथे प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले हर्षदीप दिवानसिंग सोलंकी यांना यंदाचा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे दिला जाणारा कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार नुकताच ऑनलाईन प्रदान झाला..
ते मूळ बलदाने जि. नंदूरबार येथील रहिवासी आहेत. त्यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असुन ते मागील 4 वर्षापासून उपजिल्हा रुग्णालय, मतिमंद शाळा येथे अन्नदान करत असतात. त्यांनी कमी वयात विविध राज्यस्तरीय पद देखील भूषविली आहेत. यांचीच दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान झाला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन संस्थेचे अध्यक्ष मा. भरतजी माणिकराव गावित यांनी देखील विशेष कौतुक केले आहे.
Tags
news
सोलंकी सर.. आपल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मनपुर्वक अभिनंदन..
उत्तर द्याहटवा