प्राचार्य गिरासे यांना राज्यस्तरीय पुरस्कार




 दोंडाईचा प्रतिनिधी -  तळोदा महाविद्यालयातील माजी वाणिज्य विभाग प्रमुख, एस एन डी टी महाविद्यालय शहादा येथील सेवानिवृत्त प्राचार्य आणि दोंडाईचा येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे विद्यमान अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एस. पी .गिरासे सर यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी पुणे या संस्थेच्या वतीने प्राध्यापक गिरासे सरांचे शिक्षण क्षेत्रातील विशेष भरीव योगदान च्या संदर्भात मूल्यमापन करून 2020 च्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरू गौरव शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 सदरचा पुरस्कार आणि मानपत्र ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमाने दिनांक 25 ऑगस्ट रोजी प्राध्यापक गिरासे यांना सन्मानपूर्वक बहाल करण्यात आले.
 त्यांच्या या यशाबद्दल व सन्मानाबद्दल डॉक्टर गिरासे सरांचे शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय स्तरातून अभिनंदन होत आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने