आगामी सन उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर दोंडाईचा पोलिस स्टेशनला शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन




शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी दिली आहे 

आगामी दहीहंडी गणेश उत्सव या सारख्या सार्वजनिक उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस दहीहंडी मंडळ व गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांच्यासह शांतता समिती सदस्य नगरसेवक पत्रकार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने