बेदकारपने पीकप व्हॅन चालवण्याऱ्या चालकाचा रस्त्यावर थरार




तळोदा/ प्रतिनिधी
बेदकारपने पीकप व्हॅन चालवण्याऱ्या चालकाने शहरातील भन्साली प्लाझा परिसरातील उभ्या असलेल्या हातगाड्या, मोटारसायकली, यांना धडक देऊन दोन जण यात जायबंदी झाले आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील पादचारीचीही एकच धावपळ उडाली होती. एका मोटर सायकलीला तर तब्बल पाचशे मोटर घसरत नेऊन रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली होती त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी सदर वाहन व  चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

   मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पीक अप व्हॅन क्र. एम एच ३९ ए डी १३६६   ही च्या वाहन चालकाने तळोदा शहरातील गजबजलेल्या डी पी रस्त्यावरून बेदकारपने चालवत सुरुवातीला एका हातगाडीस जोरदार ठोस दिली त्यानंतर तेथे जवळच उभ्या असलेल्या पाच ते सहा मोटरसायकलीनाही ठोस दिली. एव्हढेच नव्हे तर एका मोटर सायकलला फरफटत नेऊन सत्यम हॉटेल जवळ थांबली या अपघातात पादचारी अनिल रमेश भांडारकर (वय ३७ ) मुस्तकीन शेख मोइद्दीन  (वय ५५)  हे जबर जखमी झाले आहे. शिवाय सहा ते सात जणांना किरकोळ जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शनीनी सांगितले  दरम्यान शुक्रवारी तळोदा शहराचा आठवडे बाजार होता ही घटना गजबजलेल्या भन्साली प्लाझा परिसरात घडल्यामुळे एकच धावपळ उडाली होती. दरम्यान पोलिसांना घटनेची खबर मिळाल्या बरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, फौजदार अमितकुमार बागुल, हे. काँ.अजय कोळी, अजय पवार, विजय ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण घटनेची माहिती घेतली या प्रकरणी तळोदा पोलिसांत रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने