हर्षवर्धन पाटील यांची लक्ष्मी-नृसिंह मंदिराच्या कलशारोहण समारंभास भेट - कलशाची पूजा व घेतले दर्शन प्रतिनिधी दत्ता पारेकर



  
प्रतिनिधी दत्ता पारेकर 

        पुणे:भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे प्रसिद्ध श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिराच्या कलशारोहण समारंभ शुक्रवारी (दि.27) भेट दिली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी कलशाची पूजा करून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी लक्ष्मी-नृसिहांचे दर्शन घेऊन दमदार पावसासाठी साकडे घातले. 
               श्रीलक्ष्मी-नृसिंह मंदिर हे दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखले जाते. माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी लक्ष्मी-नृसिंह विकास आराखड्यास मोठा निधी दिला. त्यामुळे येथील विकास कामे पूर्णत्वास आली आहेत. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार मंदिराचा जीर्णोद्धारही करण्यात आला असून,  कलशारोहणाचा कार्यक्रम आज धार्मिक विधीनी विधिवतपणे पार पडला. यावेळी लक्ष्मी-नृसिंह देवस्थानच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीत त्यांनी लक्ष्मी-नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांशी चर्चा केली.
            यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मंदिर परिसराची पाहणी केली तसेच गावातील विविध विकास कामांचीही पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह  पाटील, मयुरसिंह पाटील, हरिभाऊ घोगरे, संजय बोडके, बाळासाहेब मोहिते, नाथाजी मोहिते, शरद जगदाळे पाटील, सरपंच  सरपंच चंद्रकांत सरवदे, उपसरपंच विठ्ठल देशमुख, अण्णा काळे, हनुमंत काळे, विलास ताटे देशमुख, संतोष मोरे, किशोर मोहिते, पप्पू गोसावी, बापू जगदाळे, तानाजी जगदाळे, सचिन कदम, अनंत काळे, राजाराम ढवळे, विजय सरवदे, शहाजी पावशे,प्रकाश काळे, कार्यकर्ते, पदाधिकारी व  ग्रामस्थ उपस्थित होते.
         दरम्यान, नीरा नरसिंहपूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने केक कापून सत्कार करण्यात आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने