शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे प,से, गावाचे पोलीस पाटील राजेंद्र बोरसे हे कोरोना विषाणू मुळे मयत झाले होते यामुळे शिंदखेडा विभागातील पोलीस पाटील संघटना व डीवायएसपी माननीय अनिल माने तसेच शिंदखेडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील बाबड यांच्या सहकार्यातून राजेंद्र बोरसे यांचा वारसास अठरा हजाराची आर्थिक मदत करण्यात आली
शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे गावाचे पोलीस पाटील राजेंद्र बोरसे यांचा स्वभावमनमिळावू व सगळ्यांना मदत करणारे होते गावात करोना कालावधीत काम करीत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली व ते धुळे येथील जवाहर मेडिकल फाउंडेशन येथे दवाखान्यात उपचार घेत असताना नऊ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला,त्यांच्या मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या घरातील कर्ता पुरूष गेल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती अशा बिकट परिस्थितीत पोलीस पाटील संघटना संकटकाळी धावून जाऊन त्यांना आर्थिक मदती साठी पुढाकार घेतला तसेच कोरोना काळात संकटकाळी मदत करणारे पोलिसांतील देव माणूस पोलीस अधिकाऱ्यांचे कर्तव्य पार पाडत असतानाआपल्या खांद्याला खांदा लावून काम करणारे ग्रामीण भागातील पोलिस बांधव यांच्या कोरोना मुळे निधन झाल्याने त्यांना फुल नाहीतर फुलाची पाकळी म्हणून शिरपूरचे डीवायएसपी माननीयअनिल माने तसेच शिंदखेडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सुनील बाबड यांनी प्रत्येकी पाच पाच हजार रुपयांची मदत देऊन तर पोलीस पाटील संघातर्फे आठ हजाराची मदत अशी एकूण 18 हजार रुपयांची आर्थिक मदत डीवायएसपी अनिल माने यांच्या हस्ते मयत,पोलीस पाटील राजेंद बोरसे यांची पत्नी हिराबाई बोरसे मुलगा मुकेश बोरसे यांच्याकडे आज दिनांक बिजासनी मंगल कार्यालय सुपूर्द करण्यात आली राजेंद्र बोरसे यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देऊन, आधार दिला तसेच शासनाकडून 50 लाखाचा विमाचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीवायएसपी अनिल माने प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक माननीय सुनील बाबड होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर महेंद्र पाटील यांनी केले तर आभार गणेश गिरासे यांनी मानले,पोलीस पाटील बांधवाच्या मदतीसाठी धावून आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर भदाणे चरण सिंग गिरासे भैया नगराळे युवराज माळी प्रदीप गिरासे अनंत देशमुख कृष्णा पाटील सरदार सिंग गिरासे छोटू पाटील , राहुल पाटील,मानसीपाटील स्वाती आव्हाड अनिता पाटील
Tags
news