पुण्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार ! प्रतिनिधी दत्ता पारेकर




प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे प्रतिनिधी : सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं. दत्तवाडी परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. घरी घेऊन जातो, असं सांगत आरोपींनी पीडितेवर भलत्याच ठिकाणी नेऊन सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी चार नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पुण्यातील जनता वसाहत परिसरात ही सामूहिक बलात्काराची घटना घडली. २५ वर्षीय पीडित तरुणी शुक्रवारी सायंकाळी स्वारगेटवरून आपल्या घरी कात्रजला जात होती. यावेळी तिला चारपैकी एक आरोपी भेटला. ‘तुला घरी सोडतो’, असं म्हणून पीडितेला जनता वसाहतीत घेऊन गेला.

आरोपी पीडित तरुणीला जनता वसाहतीत एका घरात घेऊन आला. तिथे अगोदरच एक आरोपी हजर होता. ती महिला घरात बसल्यावर काही वेळाने आणखी दोन आरोपी घरात आले व त्यानंतर चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. आदित्य पवार, दुर्वेश जाधव, श्रीकांत सरोदे आणि आशिष उर्फ राड्या मोहिते अशी अत्याचार करणाऱ्या चार नराधमांची नावं आहेत.

२५ वर्षीय पीडित तरुणी मतिमंद असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ती घरी कात्रजला जात होती. तरुणी घरी जात असतानाच आरोपीची तिच्यावर नजर पडली. पीडित तरुणी मतिमंद असल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपीने तिला ‘घरी सोडतो’ असं म्हणून कात्रजला घेऊन जाण्याऐवजी आपल्या घरी जनता वसाहत परिसरात नेले.

दत्तवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास पर्वती पायथा येथील गल्ली नंबर ८ मधून एका महिलेने फोन करून पोलिसांना सांगितलं की, ‘एका महिलेचा घरातून रडण्याचा आवाज येत आहे. तिला मदतीचा गरज आहे.’ ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने