थाळनेर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशन ने आज दिनांक 22 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत बनावट दारू साठा सह एकूण सात लाख 86 हजार 250 रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपनीय बातमीदार द्वारे माहिती प्राप्त झाली होती की त्यांच्या पोलीस स्टेशन हद्दीत स्पिरिट खरेदी विक्री व दारू साठा वाहतूक करण्यात येण्यात येणार असून या पासून विनापरवाना बेकायदेशीर बनावट दारू तयार करून विक्रीच्या उद्देशाने दुसरीकडे हलवणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती .
त्या अनुषंगाने एक पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला असता माहितीच्या ठिकाणी एका झोपडीच्या जवळ सिल्वर रंगाची चार चाकी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम. एच झिरो02 cv 14 13 व पांढ-या रंगाची चार चाकी मारुती सुझुकी अल्टो क्रमांक जी जे 33 b 3679 या उभ्या असलेल्या दिसल्या. पोलीस आल्याचे पाहून 4 इसम पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करून दोन इसमांना पकडण्यात आले, मात्र दोन इसम पळून जाण्यात यशस्वी झाले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे बबलू सोनू मोरे वय 24 राहणार भगतसिंग नगर शिरपूर , हरेश टपूभाई पटगिरी वय 42 रा.रोजमाळ तालुका गढडा जिल्हा बोटाद गुजरात असे असून पळून गेलेल्या इसमांची नावे मानसिंग मनजी भाई कणसागरा, वय 24 राहणार सूरइ तालुका चोटीला जिल्हा सुरेन्द्रनगर गुजरात व गोरख रामजी भरवाड वय 40 राहणार सावेर तालुका शिरपूर असे आहेत.
यावेळेस सदर झोपडीत छापा टाकला असता 36000 रुपये किमतीचे मॅकडॉल व्हिस्की चे लेबल असलेले 48 बॉटल बनावट दारूने भरलेले शील बंद केलेले, 2000 रुपये किमतीच्या प्लास्टिकच्या गोण्या त्यात लेबल व रिकाम्या बाटल्या, 1000 रुपये किमतीच्या प्लास्टिक गोणी त्यात मेक डॉल नंबर वन असेलेले झाकण, 12 हजार रुपये किमतीचे प्लास्टिक कॅन उत्तर दहा लिटर स्पिरिट शिल्लक असलेले साहित्य ,17 ,000 रुपये किमतीचे 35 लिटर चे कॅन त्यात 15 लिटर कलर्स सेंड व स्पिरीटचा रिकाम्या बाटल्या व इत्यादी साहित्य ,50 रुपये किमतीचे नरसाळे, 100 रुपये किमतीचे धातुचे बूच असलेले बनावट दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारी बाटली, 50 रूपये किमतीचे पारदर्शक रंगाची कॅरीबॅग व चॉकलेटी रंगाचे पावडर, 150 रुपये किमतीचे बनावट दारु ठेवण्यासाठी चे रिकामे बॉक्स व यासह झोपली बाहेर असलेले स्विफ्ट डिझायर कार अंदाजित किंमत 5 लाख रुपये व या गाडीच्या डिकीत 72 हजार रुपयांच्या बनावट दारू साठा ,अल्टो कार अंदाजित किंमत 1 लाख रुपये गाडीच्या डिकीत 72 हजार रुपयांच्या बनावट दारू साठा असा एकूण 7 लाख 86 हजार 250 रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून तालुक्यातील सावेर शिवारातून भिका गंगाराम भिल यांच्या शेतातील झोपडीत सदरच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे. वरील चारही आरोपींच्या विरोधात विनापरवाना स्पिरिट खरेदी-विक्री व बेकायदेशीर बनावट व मानवी आरोग्यास अपायकारक दारू आर्थिक फायद्यासाठी तयार करून विक्री करण्याच्या उद्देशाने तयार केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, सिराज खाटीक कृष्णा आत्माराम पावरा, मालचे ,राहुल बैसाने इत्यादींच्या पथकाने केली आहे.
Tags
news
Good coverage of news give farmers news more
उत्तर द्याहटवा