शिरपूर : शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधव यांना अतिवृष्टी मुळे दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी साठी आ. काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तर्फे दि. २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, भाजपा शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, शिरपूर शेतकरी साखर कारखाना संचालक भरत पाटील, माजी सरपंच ऍड. बाबा पाटील, वाठोडे सरपंच नारायणसिंग चौधरी, बाजार समितीचे संचालक अविनाश पाटील, बाजार समिती संचालक नरेंद्र पाटील, माजी सरपंच धनराज मराठे, पंचायत समिती सदस्य दर्यावसिंग जाधव, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, संतोष जाधव, जितू सूर्यवंशी आदि उपस्थित होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्याशी चर्चा करण्यात आली.
तालुक्यातील शेतकरी बांधव यांना अतिवृष्टी मुळे दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली. वादळी वारा, गारपिटीने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. यात हरभरा, गहू, मका, ज्वारी, उन्हाळी मूग, भुईमूग, केळी, पपई, आंबा, डाळींब, निंबू तसेच अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने तातडीने शासन स्तरावर प्रयत्न करावे, शासनाने शेतकरी बांधव यांना तातडीने मदत करावी नाहीतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आमदार काशिराम पावरा यांनी दिला. तसेच शिरपूर तालुक्यात मार्च २०२० मध्ये सुद्धा गारपीट, वादळी वारा व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्याचाही मोबदला मिळावा असेही त्यांनी सांगितले.
आमदार काशीराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया व उपस्थित पदाधिकारी यांनी नुकसानीची माहिती देऊन लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
तसेच विज ग्राहकांना महावितरण कडून कोणतीही पूर्वसूचना न देता कठोरपणे निर्णय घेत घरगुती, दुकानदारसह शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचा एकतर्फी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून वीज कनेक्शन तोडल्यास शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होणार आहे. दुकानदार, घरगुती ग्राहक अडचणीत येतील म्हणुन वीज कनेक्शन तोडणे थांबवावे अशी मागणी करून भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी दि. २४ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.