शिरपूर : निरंकारी परिवारात गुरुपूजा दिवस सतगुरु बाबा हरदेव सिंह महाराज यांच्या जन्म जयंती निमित्त साजरा केला जातो.
शिरपूर शाखेच्या वतीने टोल नाक्याजवळ मुंबई-आग्रा हाईवे वर सत्संग भवन नियोजित, बस स्थानक मागे, सोलर सिटी इ. ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. फक्त वृक्ष लावणे हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक भक्ताने लावलेले वृक्ष दत्तक घेतले आहे जेणेकरून त्याचे संगोपन व्यवस्थित होईल व पर्यावरणास सहाय्य होईल.
सतगुरु बाबा हरदेव सिंह महाराज नेहमी म्हणायचे, "प्रदूषण अंदर हो या बाहर हो, दोनोही हानिकारक है".
याप्रमाणे मानवाच्या मनातील व बाहेरील जगतातील प्रदूषणा पासून सुटका होण्यासाठी संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन नेहमी कार्यरत आहे. यात शिरपूर शाखेचे मुखी व सेवादल युनिट नं. 1713 चे अधिकारी जगदीश माळी तसेच त्यांचे सर्व सेवादल सदस्य व भक्तजन उपस्थित राहून कार्यक्रम राबविण्यात आला.
निरंकारी सेवादल व संत-जण मिळून कोरोना संकटाच्या काळात सामाजातील गरजू परिवारांना धान्य वितरण, सफाई इत्यादी कार्य केले असून ठिकठिकाणी या मानवी कार्याच्या गौरव प्रशासनाने केलेला आहे.
गुरुपूजा दिनानिमित्त संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन च्या अंतर्गत मंडळाच्या आदेशानुसार आरोग्य विषयक सर्व शासनाच्या नियमाचे पालन करून सोशल डिस्टंसिंग, मास्क चा वापर करून मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत धुळे झोन 36-बी चे झोनल ईंजार्ज हिरालाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शाखामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
Tags
news