ज्येष्ठत्व म्हणजे क्रियाहीन अडगळ नव्हे !



                   
*कोरोना गेला,संपला अशा काहींच्या फाजील आत्मविश्वास आणि निव्वळ बेजबाबदार वागण्यामुळे ऑगस्ट अखेरीस तीव्रता कमी झालेल्या कोरोनाचा बूमरॅंग झाला की काय अशी शंका आता येऊ लागली आहे*. *काही शहरात कोरोनाचा प्रकोप इतका वाढला आहे की,पुन्हा लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध घालण्याचे संकेत सरकारी सूत्रांकडून दिले जात आहेत. त्यासाठी घातलेल्या अनेक अटी आणि नियमांमध्ये एक खटकणारा नियम म्हणजे साठ वर्षांवरील आणि दहा वर्षांखालील कुणीही सार्वजनिक ठिकाणी वावरु नये हा होय.हा नियम सरसकट सक्तीचा न करता ऐच्छिक असावा.कारण कोरोनाचे दुष्परिणाम गेले वर्षभर लहानांपासून ते मोठे, वृद्धांपर्यंत सर्वांनी पाहिले आहेत.काय करावं काय करू नये याचा अंदाज आता सर्वांनाच आलेला आहे*. *आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यात येऊन बळी पडलेल्या रुग्णांच्या वयाचा विचार करता मरण पावलेले सगळेच काही वयोवृद्ध नव्हते. कुठल्यातरी आजाराने अथवा असाध्य व्याधीने ग्रस्त असणे. आणि प्रतिकार शक्ती कमी असणै हीच मृत्यू मागची खरी कारणं आहेत.मग वय कितीही असो तो प्रश्न गौण आहे.कोरोनाला बळी पडल्याची ही प्रमुख कारणं आहेत.प्रत्येकाला आपले आजार आणि आपल्या प्रतिकार शक्तीची जाणीव असतेच.त्यामुळे अशांनी स्वतः आपल्या   तब्येतीची काळजी घेत सार्वजनिक आरोग्यालाही बाधा येईल असे न वागता शक्यतो घरातून बाहेर पडू नये.इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे,साठ वर्षांवरील सरसकट सगळे जणच वृद्ध आणि अकार्यक्षम नसतात ैझंआज  अवतीभवती सहज जरी नजर टाकली असता आपल्याला कला,क्रिडा सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक संस्थांमध्ये साठ ते सत्तर पंचाहत्तर वयोवर्ष असलेले  अतिशय कार्यक्षम लोक तरुणांना लाजवेल इतके क्रियाशील आणि कार्यरत असलेले दिसतात.अशा तंदुरुस्त, समाजमनाचे भान असलैल्या सक्षम आणि अत्यंत क्रियाशील असलेल्या ज्येष्ठ तरुणांवर केवळ वयाच्या अटीनुसार नियम आणि निर्बंध लावायचे म्हणजे त्यांची जगण्याची उमेदच हिरावून घेतल्यासारखे होणार आहे*. *कारण मानसिक,भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या त्यांना हवे त्याठिकाणी एकाग्रतेने कार्यरत राहणे हीच त्यांच्या जीवनाची संजीवनी आहे.आणि ते हिरावून घेण्याचा आणि त्यांच्यावर जबरदस्तीने वृद्धत्व लादण्याचा अधिकार कुणालाच असता कामा नये.इतकेच*.✍🏻
*विठ्ठलराव वठारे*
*उपाध्यक्ष*
*पॉवर ऑफ मिडीया फाउंडेशन, महाराष्ट्र.*
*९३२५४९९०४६.*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने