जनतेच्या आरोग्याशी खेळ,अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ची प्रतीक्षा कन्हैया रेस्टॉरंट मधील नास्ता मध्ये झुरळ




शिरपूर - शिरपूर शहरातील हॉटेल चालक यांच्या कडे अन्न व औषध प्रशासन विभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष्य केले आहे का ? असा सवाल विचारण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.
शहरातील गुजराथी कांम्प्लेक्स मधील कन्हैया रेस्टॉरंट मधील नास्ता मध्ये जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरु असून हॉटल मालकाची बे फिकरी ग्राहकाच्या जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  विशेष म्हणजे या पूर्वी देखील याच हॉटल मध्ये असे प्रकार घडले आहेत मात्र प्रशासनने कारवाई न केल्याने हॉटल चालकाची मुजोरी वाढली आहे .
 दिनांक 18 रोजी माधवराव फुलचंद दोरीक व त्यांचे मित्र पुरोषत्तम गोवींदा पाटील शिरपूर येथे वेल्डीग कामासाठी लोखंड घेण्यासाठी शिरपूर शहरात आले होते.  सदर काम आटोपून  दोन वाजुन तिस मिनीटांनी  शिरपूर शहरातील गुजराथी कांम्प्लेक्स येथे गोपाल नारायण राठोड यांच्या मालकीचे कन्हैया रेस्टॉरंट मध्ये नास्ता करण्यासाठी गेले यांनी काऊंटर वरती रगडा समोसा या नास्ता साठी रोख पैसे देऊन नास्ताची आर्डर केली तेव्हा मात्र रेस्टॉरंट मालकाने बिल देण्यास स्पष्ट नकार दिला व बाजुच्या काऊंटर वरुन नास्ता घेण्यासाठी सांगितले तरी बाजुच्या काऊंटर वरुन नास्ता घेतला व नास्ता करते  वेळी आम्हाला रगडा समोसा या नास्ता मध्ये मेलेले झुरळ आढळुन आले.   त्याचा त्यांनी लाईव्ह व्हिडीओ चित्रीकरण केले. व मालकास तक्रार केली .  मात्र मालक यांनी अरेरावी करत ही काही मोठी बाब नसून असे होत राहते असे बेजबाबदार उत्तर दिले .या बाबत त्यांनी आंनलाईन जिल्हा अधिकारी धुळे येथे   तक्रार दाखल केली आहे आहे. व शिरपूर वरवाडे नगर परिषद मध्ये देखील तक्रार केली असून या पुढे नागरिकांच्या जीवास धोका होऊ नये म्हणून कठोर कारवाई करण्याची मागणो केली आहे.

 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने