शिरपूर तालुक्यातील रेशनचा काळाबाजारास पुरवठा विभागाचे अभय का ?


शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर तालुक्यातील  पुरवठा विभाग अंतर्गत  दुकानांमधील मधील काळाबाजार  हा सर्वश्रुत आहे. तालुक्यातील एकूण मंजूर रेशन दुकान पैकी  जवळपास  तीस टक्के  दुकाने  ही त्यांचे मूळ मालक न चालवता  त्यांच्या बोलवता धनी  दुसराच कोणी असल्याची  चर्चा  नेहमीच होत असते.  मात्र तालुक्यातील  दुकानांवर डल्ला मारून  चालवणारे  हे डॉन नेमके कोण  आणि यांना कोणाचे अभय आहे  याचा शोध  मात्र लागते लागता लागत   नाही.  गेल्या अनेक वर्षांपासून  पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी  आपल्या डोळ्यावर  गांधारी प्रमाणे   स्वार्थाचे  काळी पट्टी बांधली असून  अनेक वर्षापासून  रेशन मधील  हा काळाबाजार  सर्रासपणे सुरू आहे.  यात समाविष्ट असलेले   कथाकथित  रेशनचे डॉन  यांनी पुरवठा विभागातील  प्रमुख अधिकाऱ्यांना आपल्या हाताशी धरून  आजवर  करोडोंची माया जमवली  आहे.  मात्र  खालून वर पर्यंत  लक्ष्मी दर्शनाचा लाभ  होत असल्यामुळे  आज पर्यंत  या गैरव्यवहाराबाबत  चौकशी करण्याचे धाडस  कोणीच केलेले नाही. असे असताना  शासनाच्या नवीन सुधारित नियमानुसार  ऑनलाइन खरेदी प्रक्रिया, ग्राहकांचे थम, पी  ओ एस मशीन  ,नोंदणी   इत्यादी सुधारणा झाल्यामुळे  रेशन मधील काळा बाजारास  प्रतिबंध लागला असला तरी काही  प्रमाणात देखील  हा काळाबाजार अविरत सुरू आहे. पुरवठा विभाग  याबाबत याबाबत  किती संवेदनशील आहे  हे नव्याने सांगण्याची गरज नाही.  नागरिकांनी याबाबत तक्रार केली तर दबावतंत्राचा वापर करून ती तक्रार मागे घ्यायची किंवा मग तक्रारीला केराची टोपली दाखवायची  हा प्रकार  सर्रास सुरू आहे. यात माहिती अधिकाराचा वापर केला  तरी पद्धतशीरपणे बगल देण्याचे काम केले जाते. शिरपूर तालुक्यातील  बलकुवे गावातील  रेशन दुकाना बाबत  वारंवार माहिती अधिकारात माहिती विचारून  तक्रार करून देखील  आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. जिल्हास्तरावर  विभागीय स्तरावर  तक्रार केल्यानंतर  जेव्हा त्याची दखल घेतली जात नाही  तेव्हा तक्रारदार यांनी  थेट पंतप्रधान कार्यालयात  याची तक्रार केली.
  बलकुवे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते  माधवराव दोरिक  यांनी पुरवठा विभागात  माहिती अधिकारातून  त्यांच्या गावात असलेल्या रेशन दुकाना बाबत माहिती मागवली होती यात प्रामुख्याने  शासन नियमानुसार  रेशन दुकान धारकाने  गावातील  दक्षता समिती ची नावे, तक्रार वही, शिल्लक मालाचा साठा  याबाबत  फलक लावणे अनिवार्य आहे. शिवाय पुरवठा निरीक्षक यांनीदेखील  या सर्व नियमांच्या पाठपुरावा करून  व वेळोवेळी भेट देऊन  या बाबत निरीक्षण नोंदवणे हे देखील गरजेचे आहे. माझं  ज्यावेळेस सदरची माहिती  माहिती अधिकारातून मागितलेली  त्यावेळेस  सन 2017 नंतर  आज पर्यंत  मागील दोन वर्षात  पुरवठा निरीक्षक यांनी  दुकानांना भेटी देऊन कोणतेही निरीक्षण नोंदवले नाही  असा अभिप्राय असलेले  उत्तर तक्रारदार यांना दिले होते. यावरून तक्रारदार यांनी  नाशिक विभागीय आयुक्त यांना  तक्रार करून  संबंधित पुरवठा निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबत आयुक्त यांनी  धुळे जिल्हा पुरवठा अधिकारी  चौकशीचे आदेश दिले असून  कारवाई करण्याबाबत सूचित केले आहे. विभाग त्यावर काय कारवाई करतो  हे येत्या काळात समोर येईलच  मात्र रेशन दुकान वर नियंत्रण ठेवण्यात काळाबाजार थांबवण्यात पुरवठा निरीक्षक किती कार्यक्षम आहेत याची यावरून प्रचिती येते.  त्यामुळे शिरपूर तालुक्यातील रेशनचा काळाबाजारास  पुरवठा विभागाचे अभय का ?  हा प्रश्न सामान्यांच्या मनात येतो.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने