शिरपूरात श्री गायत्री परिवार व विवेकानंद केंद्राद्वारे राष्ट्रीय युवा दिवस व राजमाता जिजाऊ जयंती समारोह साजरा*




शिरपूर - येथील श्री गायत्री परिवार ट्रस्ट, स्वामी विवेकानंद केंद्र व अ. भा. विद्यार्थी परिषदेमार्फत श्री गायत्री मंदीरात आज सायं. ४:०० वाजता राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती समारोह साजरा केला.
     युवा दिनिनिमित्त जयपालसिंह गिरासे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी स्वामी विवेकानंदांचे कार्य व राजमातांचे जीवन व राजे शिवाजी कसे घडले याबद्दल व्याख्यान दिले. प्रतिमापूजन व मशाल प्रज्वलन शिवाजीराव पाटील गुरुजी, कमलकिशोर भंडारी, हेमराज राजपूत, प्रल्हाद सोनार, एस. डी. माळी रावसाहेब यांनी केले.
     यावेळी निलिमाताई ठाकूर, रेखाताई तिवारी यांनी ईशस्तवन, प्रार्थना घेतली. विवेकानंद केंद्र शिरपूर मार्फत होणार्‍या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली गेली. गायत्री परिवाराचे अरुण पटेल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. 
     समारंभाचे सूत्र संचालन प्रल्हाद सोनार यांनी तर आभार प्रदर्शन आर. बी. महाजन यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने