पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा



पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

शहादा, ता.शहादा, जि. नंदुरबार

शहादा :- आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने "महिला सक्षमीकरणासाठी योग" या थीमवर "आंतरराष्ट्रीय योग दिवस" महाविद्यालयातील गुरुवर्य कै.श्री सी.डी.शाह सभागृहात मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी शहादा येथील योग प्रशिक्षक प्रा.सौ.मंगल रविंद्र पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने योग प्रशिक्षक प्रा.सौ.मंगल पाटील यांनी उपस्थित सर्वाना विविध योगासने, आसने, प्राणायाम व त्यांचे महत्त्व पटवून दिले. योग प्रशिक्षक प्रा.सौ.मंगल पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, योगासने हे खूप महत्त्वाचे असून योगासनांमध्ये शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याला ही भर देण्यात मदत होते. योगासनांमुळे तणावापासून मजबूतीपर्यंत आणि नकारात्मकपासून सकारात्मककडे जाण्याचा  मार्ग दाखवतो. योग केल्याने शरीराची लवचिकता ही वाढत असते आणि शरीर सुदृढ बनत असते. त्याचप्रमाणे ध्यान केल्यानें एकाग्रता वाढत असते तसेच मन शांत आणि प्रसन्न राहत असते. योग अभ्यास, ध्यान हे शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याचे प्रभावी साधन आहे. दररोज योगासने, प्राणायाम केल्याने रोगप्रतिकारक क्षमता, तसेच ध्यान केल्याने एकाग्रता, आत्मविश्वास वाढत असतो व सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढत असते. ध्यान केल्याने आपण तणावमुक्त होत असतो व अध्यात्मिक ज्ञान मिळते तसेच शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहते. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयतील प्राध्यापक व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.हितेंद्र चौधरी यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने