महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने डॉ पंजाबराव देशमुख यांची 125 वी जयंती निमित्ताने कृषी संजीवनी पंधरवडा
*महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने डॉ पंजाबराव देशमुख यांची 125 वी जयंती निमित्ताने मौजे वाडी पुनर्वसन (जिवननगर) येथे कृषी संजीवनी पंधरवडा अंतर्गत 20 जुलै रोजी गुणवत्तापूर्ण निविष्ठांची ओळख दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना श्री योगेश एस मिस्त्री (कृषी सहाय्यक) यांनी केली कृषी विभागातील विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच यावेळी एस.बी. बागुल(मंडळ कृषी अधिकारी) यांनी कृषी निविष्ठा बाबत माहिती देण्यात आली खतांचा समतोल वापर कसा केला जातो त्याविषयी मार्गदर्शन केले पी एम किसान, जमीन सुपीकता निर्देशांक फल, महाडीबीटी योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा, या योजनेविषयी माहिती दिली.नंतर कार्यक्रमाला श्री तानाजी खर्डे साहेब (उपविभागीय कृषी अधिकारी शहादा यांनी बियाणे कायदा 1966, ग्राहक संरक्षण कायदा 1986, बियाणे खरेदी करताना काय काळजी, महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम २००९ याविषयी माहिती सांगितली श्री ए. ए. महिरे ( कृषी पर्यवेक्षक) श्री धनराज निकुंभे (कृषी सहाय्यक ) किरसिंग वसावे सरपंच) ओरसिंग पटले गुरुजी,सरदार पावरा (उपसरपंच), मालसिंग दादा, लयसिंग पावरा, सायका पावरा भायसिंग पावरा, गोवरजी पावरा यांचे सहकार्य लाभले.*