,
*म रा वि कंपनीचे सहा अभियंता हितेंद्र बढे यांची बदली करा - शामकांत ईशी यांची मागणी*
शिरपूर (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चे सहायक अभियंता हितेंद्र विठ्ठलराव बढे हे एकाच ठिकाणी सात ते आठ वर्षांपासून एकाच उपविभागात कार्यरत आहे त्यांची मनमानी व दादागिरी सुरू आहे तरी त्यांची तालुक्यातून त्वरित बदली करून ग्राहकांना न्याय देण्याची मागणी प्रदेश भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शामकांत जगन्नाथ ईशी यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चे सहायक अभियंता हितेंद्र विठ्ठलराव बढे हे शहरातील उपविभाग क्रमांक १ येथे एकाच ठिकाणी ७ ते ८ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची मनमानी कारभार सुरू असून दादागिरी सुरू आहे. प्रत्येक ग्राहकांशी उर्मट व उद्धट पणे वागून लूटमार करीत आहेत नवीन वीज जोडणी असो वा जास्त बिलाची तक्रार असो आर्थिक मागणी मोठ्या प्रमाणात करत असून न दिल्यास नवीन कनेक्शन न देणे, जास्त बिलाची तक्रार असल्यास प्रॉब्लेम न सोडवता ग्राहकांना जोराने बोलून धमकावून दादागिरी करून पैशाची मागणी केली जाते , महिलांशी उद्धट पने वागून अरेरावीची भाषा करतो.नवीन सोलर बसविल्यास त्यांना पैसे घेतल्या शिवाय परवानगी देत नाही,साईट बंद असल्याचेसांगून फिरवतो पैशे शिवाय काम करत नाही खूपच वाईट वागणूक आहे
शासनाचे दर ३ वर्षांनी बदलीचे नियम असताना सर्व नियम धाब्यावर बसवून बढे यांची आजपावेतो बदली झाली नाही तालुक्यात सुद्धा उपविभागात बदली झाली नाही एवढी त्याची दादागिरी आहे.
तरी सहाय्यक अभियंता हितेंद्र विठ्ठलराव बढे यांची शिरपूर तालुक्यातून बदली करून शिरपूर येथील विज ग्राहकांना न्याय देण्याची मागणी प्रदेश भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शामकांत जगन्नाथ ईशी यांनी केली आहे.