शिरपूर तालुक्यात वन जमिनींसाठी बनावट जोडपत्र तयार करणारी टोळी कार्यरत?
चौकशी करून कारवाई करण्याची किसान सभेची मागणी
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभा हे संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी सतत लढत असतात.
शिरपूर तालुक्यात आदिवासी बांधवांना वनपट्टे वाटप करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत असताना बनावट जोडपत्र तयार करून पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना पात्र दाखवण्यात येऊन शासनाची फसवणूक केली जात आहे असा आरोप करून अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्या या टोळी ची चौकशी करावी व चौकशी अंतिम दोषींवर कारवाई करावी अशी मागणी किसान सभेने निवेदनातून केली आहे.
याबाबत दिनांक 20 जून 2024 रोजी किसान सभेने जिल्हाधिकारी सो धुळे, उपविभागीय अधिकारी शिरपूर, आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
यात असे म्हटले आहे की किसान सभेच्या नेतृत्वाखाली २६, २७, २८ फेब्रुवारी २०२१ मध्ये सांगवी ते धुळे पायी मोर्चा काढून १२,०००/- वन जमीन धारक शेतकऱ्यांना जे- फॉर्म मिळवून देण्यात यश मिळवले आहे.
जे-फॉर्म धारकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे. परंतु शिरपूर तालुक्यात बोगस जोडपत्र-२ देणारी टोळी निर्माण झालेली आहे. त्या जोडपत्र-२ व्दारे शासनाचा योजनांचा लाभ देखील घेतला जात आहे. जे-फॉर्म देतांना जोडपत्र-२ ची नक्कल उपविभागीय अधिकारी यांचे सहीने देण्यात आली होती. त्यावेळी देखील बोगस जोडपत्र-२ आढळून आलेले होते.
तरी किसान सभेची मागणी आहे की, शिरपूर तालुक्यात कोणताही पाठपुरावा न करता तसेच दावा प्रस्ताव पेंन्डींग नसतांना देखील जोडपत्र-२ चे देण्याचे षडयंत्र सुरु आहे. अश्या अनेक तक्रारी किसान सभेकडे आलेल्या आहेत. परंतु ज्यांना हे जोडपत्र-२ मिळते तें त्यासाठी लाखो रुपये देखील खर्च केल्याचे बोलले जात आहे. म्हणून सदर जोडपत्र-२ संदर्भात आपल्या विभागामार्फत चौकशी करुन तलाठी व कृषी विभागांना तसे आदेश करण्यात यावे. तसेच सदर जोडपत्र-२ वर उपविभागीय अधिकारी यांच्या सहीने तलाठी मार्फत वाटप करण्यात यावे. तसे न झाल्यास सदरील जोडपत्र-२ बोगस, बनावट आढळल्यास त्या व्यक्तीवर कारवाई केल्यास संपूर्ण षडयंत्राचा तपास लागू शकतो, अशी किसान सभेची मागणी आहे. म्हणून लवकरात लवकर सदरील षडयंत्राची चौकशी होवून त्यात सामील असलेल्या टोळीवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी किसान सभेने केली आहे.
सदरच्या निवेदनावर अॅड. हिरालाल पी. परदेशी
प्रदेशाध्याक्ष म.रा.किसान सभा, महाराष्ट्र,अॅड. संतोष पाटील,जिल्हाध्यक्ष शेत मजूर पुनियन,सतिलाल पावरा जिल्हाध्याक्ष म.रा. किसान सभा धुळे,भरत सोनार,तालुकाध्यक्ष शेत मजूर युनिधन, नारसिंग पावरा श. अध्यक्ष म.रा. किसान सभा शिरपूर,जितेंद्र देवरे श. अध्यक्ष म.रा.किसान सभा शिरपूर इत्यादी कार्यकर्त्यांनी सह्या केल्या आहेत.