आंतरराष्ट्रीय योग दिन




आंतरराष्ट्रीय योग दिन

जगभरात योगाचा प्रचार- प्रसार करण्यासाठी आणि त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. ‘‘योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने  एक अमूल्य देणगी दिली आहे. मन व शरीर, विचार व कृती, संयम व पूर्णता, मनुष्य व निसर्ग यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप योग देतो असे सिद्ध झाले आहे. आरोग्य व स्वत:च्या कल्याणसाठी सर्वांगीण दृष्टिकोन योग प्राप्त करून देतो. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा उत्तम मार्ग आहे. आपली जीवनशैली बदलून आणि चेतना निर्माण करून आरोग्य सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. २१ जून हा वर्षांत सर्वात मोठा दिवस मानला जातो, ज्याला ‘उन्हाळी संक्राती’ असे म्हटले जाते. उन्हाळी संक्रांती हा उत्तर गोलार्धातील सर्वात जास्त प्रकाश असलेला दिवस आहे. पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोनात सूर्याकडे झुकतो, त्यामुळे दिवस मोठा होतो. २१ जूननंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. त्यामुळे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. 
दरवर्षी एक विशेष थीम लक्षात घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते.  २०२४ या वर्षासाठी ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी थीम ठेवण्यात आली आहे.  या  वर्षी मध्यवर्ती कल्पनेसह महिलांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. महिलांचे सर्वांगीण कल्याण वाढवण्यात आणि परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. हे अधोरेखित करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली आहे. हा दिवस महिलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासातील प्रगती साजरी करेल, असा विश्वास ही थीम निवडताना व्यक्त करण्यात आला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने