*रेवानगर येथील आदिवासी तरूणाचा खून करणा-यांना अटक करा- बिरसा फायटर्सची मागणी*
तळोदा प्रतिनिधी: तळोदा तालुक्यातील रेवानगर पुनर्वसन येथील देवदास लेह-या पावरा या आदिवासी तरूणाच्या मृत्यूची सखोल चौकशी करून संशयीत आरोपींना तात्काळ अटक करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेने पोलीस निरीक्षक तळोदा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य महासचिव बारक्या पावरा,जिल्हाध्यक्ष हिरामण खर्डे,जिल्हा सल्लागार डोंगरसिंग पावरा,प्रकाश पावरा, विलास पावरा, दिलीप पावरा,दिगंबर पावरा, युवराज पावरा, मित पावरा, आस्तर पावरा, ईश्वर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
तळोदा तालुक्यातील रेवानगर पुनर्वसन येथील देवदास लेह-या पावरा या आदिवासी तरूणाची दलेलपूर परीसरात इलेक्ट्रिक शाँक लागून मयत झाल्याची घटना दिनांक १३ जून २०२४ रोजी घडली होती ,अशी अफवा पसरविण्यात आली होती.परंतु त्या तरुणाचा खून झाल्याचा आरोप रेवानगर येथील ग्रामस्थांनी केला आहे. कारण त्या तरूणाचा चेहरा जळालेला, डावा हात जळून तुटलेला अवस्थेत दलेलपूर परीसरात आढळून आला होता. त्या तरूणाची नंतर ओळख पटली.त्या तरूणास काही जण रेवानगर येथील राहत्या घरातून काही न सांगता घेवून गेले होते.त्यामुळे त्या तरूणाचा खून झाला आहे,असे ग्रामस्थ करीत आहेत. तरुणाचा मृतदेह पाहून त्याचा मृत्यू हा इलेक्ट्रिक शाँक लागून झाला नसून त्याचा घातपात केल्याचा संशय निर्माण होतो.म्हणून रेवानगर येथील तरूणाच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून संशयितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी.हीच नम्र विनंती,अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून पोलीस प्रशासनास देण्यात आला आहे.