माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर
कार्यकर्ता नोंदणी अभियान सुरु
अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांना सहभागाचे आवाहन.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र या संघटने तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्याचे प्रचार, प्रसार व प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित कार्यकर्ते घडवण्याचे कार्य अविरत पणे गेली अनेक वर्ष सुरु आहे. या कार्यात महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाषजी बसवेकर यांनी पूर्णवेळ या संघटनेसाठी दिलेला असून त्यांनी महाराष्ट्रात हजारो कार्यकर्त्यांना माहिती अधिकार कायद्याचे प्रशिक्षण देऊन समाजाला प्रशिक्षित असे कार्यकर्ते दिलेले आहेत. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात तसेच गावागावात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे प्रशिक्षित सदस्य आहेत जे संपूर्ण महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करीत आहेत.
याचाच एक भाग म्हणून दिनांक १ जून २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत महाराष्ट्रात कार्यकर्ता नोंदणी अभियानाची सुरवात केलेली आहे. जे सदस्य सहभागी होतील यांचे एक अधिवेशन घेण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जे सदस्य या अभियानात सहभागी होतील त्यांना माहिती अधिकार कायद्याचे सखोल प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच नोंदणी करणारे सदस्य ज्या जिल्ह्यात वास्तव्यास आहेत त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या whatsaap ग्रुप मध्ये सहभागी करून घेण्यात येईल या ग्रुप मध्ये सहभागी होणार्या सभासदांना प्रशिक्षित कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच सर्व सहभाग घेणाऱ्या सदस्यांना माहिती अधिकार अधिनियम २००५ या कायद्या विषयीचे पुस्तके पीडीएफ स्वरुपात मोफत उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच प्रत्येक सदस्यास ओळखपत्र दिले जाईल.
देशात व राज्यात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. राज्यात अनेक सरकारी बाबू हे सर्वसामान्याचे कामे करीत नाहीत. कायदे व नियम माहिती नसल्यामुळे या अधिकाऱ्यांचे फावते व सर्वसामान्यांना नेहमी आपल्या न्याय हक्कासाठी सरकारी कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागतात. आपली कामे करून घेण्यासाठी काहीतरी चिरी मिरी द्यावी लागते. असा सर्वसामान्य नागरिकांचा समज आहे. व राज्यातील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये असे प्रकार हि सर्रास पणे सुरु आहेत. या मुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे.
देशातील तसेच राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये त्यांची कामे मर्यादित वेळेतच व्हावीत, तसेच सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार थांबावा या साठी अण्णा हजारे व अनेक समाज सुधारकांनी अभ्यास करून माहिती अधिकार अधिनियम २००५, हा कायदा अमलात आणावयास सरकारला भाग पाडले व या कायद्याच्या चौकटीत सर्व सरकारी कार्यालये आणली या कार्यालयांमध्ये होणाऱ्या प्रत्येक कामकाजाची माहिती तसेच त्या कार्यालयातील एकूण एक सर्व माहिती सर्व सामान्य नागरिकांना ३० दिवसाच्या आत मिळावी असी तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे. परतू माहिती अधिकार अधिनियम २००५ या कायद्याचे सर्वसामान्य नागरिकांना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण नसल्यामुळे तसेच या कायद्याचे सखोल ज्ञान नसल्यामुळे सरकारी बाबू याच कायद्याचा दुरुपयोग करीत आहेत. व सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळवण्यापासून वंचित ठेवत आहेत. परतू या कायद्याचे संपूर्ण प्रशिक्षण घेतलेल्या कार्यकर्त्यांना कुठल्याही सरकारी अथवा निमसरकारी कार्यालयातून वेळेच्या आत माहिती मिळते. जण माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडून अर्जदारास माहिती वेळेत दिली जात नाही ती माहिती वेळेत कशी उपलब्ध करून घ्यावी, सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेत माहिती न दिल्यास पुढे प्रथम अपील कुठे करायचे असते, द्वितीय अपील कुठे केलेलं गेले पाहिजे, किती दिवसाच्या आत अपील करावे, माहिती न देणाऱ्या सरकारी अथवा निमसरकारी अधिकारी अथवा कर्मचारी यांच्यावर माहिती अधिकार कायद्यान्वये कुठली कार्यवाही होऊ शकते, कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी, तसेच माहिती अधिकार कायद्यात झालेल्या नवीन सुधारणा, कायदे, शासनाचे नवीन परिपत्रके, या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याची सखोल माहिती असल्यास कार्यकर्ता प्रशिक्षित असल्यास तो सहज माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो. व समाजाला न्याय मिळून देतो तसेच भ्रष्टाचार होण्यापासून रोखू शकतो. या साठी प्रत्येक नागरिकाला माहिती अधिकार अधिनियामा विषयी सखोल माहिती असायलाच हवी.
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे त्यांनी १ जून २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या सदस्य मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी https://rtimahasangh.weebly.com या वेबसाईड वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा तसेच अधिक माहिती साठी महेश पाटील, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, मो. न – ९०७५०४२९५५. यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष बसवेकर सर, श्री. चंद्रभान कोलते, राज्य कार्याध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, श्री. साहेबराव वाघ, राज्य कार्यकारणी सदस्य, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, श्री. महेश पाटील, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आवाहन केलेल आहे.