निर्भीड विचारच्या बातमीवर शिक्का मोर्तब
नंदुरबार मतदार संघात भाजपच्या उमेदवारांचे पराभवाचे केले होते भाकित
काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांचा दणदणीत विजय
राजकारण - महेंद्रसिंग राजपूत
आज देशाच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले. या निवडणुकीत धुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे वाट बिकट असल्याबाबत दोन दिवसांपूर्वी निर्भीड विचारणे बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीस्वाचकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता.
यात धुळे मतदारसंघात भाजपच्या डॉक्टर सुभाष भामरे यांच्या पराभव झाला आहे. याआधी त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते .
तर नंदुरबार मतदारसंघात मात्र मोठ्या फरकाने पराभवाला भाजपला सामोरे जावे लागले. त्यामुळे एका अर्थाने निर्भीड विचार च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या बातमीमध्ये आम्ही जनतेने मतदान निवडण्यासाठी नाही तर पाडण्यासाठी केले असे देखील अधोरेखित केले होते ते देखील सिद्ध झाले आहे.
नंदुरबार मतदार संघात सुरुवातीस भाजपाचे दिग्गज उमेदवारी डॉक्टर हिना गावित यांच्यासमोर काँग्रेसने कमकुवत व नवखा चेहरा उमेदवार म्हणून दिला असा कयास लावला जात होता. मात्र निवडणूक रंगात येताच नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आमदार के. सी. पाडवी यांचे पुत्र एडवोकेट गोवाल पाडवी यांना मतदार संघातून मोठा भरघोस प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली होती. तेव्हापासूनच ही निवडणूक रंगात आली होती.
तसे पाहता नंदुरबार मतदारसंघ हा पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघ आहे. काँग्रेसच्या अनेक जुन्या दिग्गज नेत्यांची नंदुरबार मतदार संघाशी नाळ जोडली गेली आहे. काँग्रेसचे अनेक कार्यक्रम व निवडणूक प्रचाराची सुरुवात या मतदारसंघातून होत होती. मात्र नरेंद्र मोदींच्या 2014 च्या आणि 2019 च्या लाटेत हा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात गेला होता. मात्र तो पून्हा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी या निवडणुकीत काँग्रेसने कंबर कसली होती. म्हणून काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांच्या नंदुरबारात सभा झाल्या होत्या. व परिवर्तनाची सुरुवात झाली होती.
यातच भाजपमधील अंतर्गत कलह, स्थानिक आणि राज्य पातळीवर आणि देश पातळीवरील नेत्यांविषयीची नाराजी, महागाई, बेरोजगारी, आदिवासींचे प्रश्न, ठराविक घराण्यांची वाढते मक्तेदारी, नंदुरबार जिल्ह्यात खोपवलेली ठेकेदारी, इत्यादी विविध कारणांनी जनतेतील नाराजी उफाडून आली होती.
या सर्व नाराजीच्या सूर निवडणूक काळात स्पष्टपणे दिसून येत होता. त्यामुळे आजवर झालेल्या सर्व निवडणूक सर्वे मध्ये नंदुरबारची जागा भाजप हरणार हे अधोरेखित केले जात होते. शिरपूर तालुका वगळता सर्वच ठिकाणी भाजपला अपयश येताना दिसले.
शिरपूर तालुक्यात शेवटच्या टप्प्यात आमदार अमरीश भाई पटेल यांनी मतदानात सहभाग घेतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी जोश भरला होता. मात्र तालुक्यात त्यांच्या देखील करिष्मा यावेळेस पाहिजे तसा चालला नाही. आणि तालुक्यातून काँग्रेसला देखील मतदारांनी पसंती दिली. त्यामुळे 50 हजार आणि 40 हजाराच्या लीड देणारा तालुका आता निम्मेवर येऊन ठेपला आहे. आणि या निवडणुकीत शिरपूर तालुका नाही 20,057 मतांच्या लीड दिला.विधानसभेच्या निमित्ताने ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.
या निवडणुकीत झालेल्या अंतिम मोजणी नुसार काँग्रेस उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी यांना 7लाख 05 हजार 907 मते मिळाली तर भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांना पाच लाख 53 हजार 445 मते मिळाली.
त्यामुळे या निवडणुकीत एडवोकेट गोवा पाडवी यांचा 1 लाख 52 हजार 462 मतांनी दणदणीत विजय झाला.
शिरपूर तालुक्यातील निवडणुकांचे वार्तांकन करताना निर्भीड विचारणे नेहमी सत्य कटू आणि ठोस भूमिका मांडून पत्रकारिता करत भूमिका बजावली होती. त्यामुळे निर्भीड विचारणे दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या बातमीवर आता जनतेच्या मतांनी शिक्का मोर्तब केले आहे. आणि आम्ही वर्तवलेले भाकीत खरे ठरले आहे.
धनशक्ती विरुद्ध जनशक्ती च्या या लढ्यात विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी यांचे निर्भीड विचार न्यूज परिवाराकडून हार्दिक अभिनंदन.