सौ.अमृताताई महाजन यांना पीएचडी जाहीर*




*सौ.अमृताताई महाजन यांना पीएचडी जाहीर*

शिरपूर : येथील किसान ज्ञानोदय मंडळ गुढे संचलित महात्मा ज्योतिबा फुले होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या सचिव सौ.अमृता मनोज महाजन यांना श्री गंगा नगर (राजस्थान) येथील टांटिया विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) पदवी जाहीर करण्यात आली. त्यांनी शिक्षण या क्षेत्रांतर्गत *_अ स्टडी ऑफ टीचर फ्रीजिंग ऑफ सीबीएसई अँड एसएसबी हायर सेकंडरी स्कूल टीचर्स इन रिलेशन टू दीअर सेन्स ऑफ ह्यूमर, पर्सनॅलिटी अँड टीचर कॉम्पिटन्सी_* या विषयावर शोध प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. त्यांना डॉ.किरण गिल यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाचे किसान ज्ञानोदय मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उत्तमराव महाजन, उपाध्यक्ष डिगंबर माळी, गुढे येथील लोकनियुक्त सरपंच सौ.कल्पनाताई महाजन, संस्थेचे संचालक तथा भडगाव बाजार समितीचे संचालक डॉ.मनोज महाजन, संचालक डॉ.हरीश महाजन, चाळीसगाव येथील केडीएमजी आयुर्वेद महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.मेघा महाजन व संचालकांनी कौतुक केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने