*धनगर समाज जातीय सलोखासाठी एक पाऊल पुढे* **गरीब नवाज वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष नबुदादा पिंजारी यांनी केले गुलाब पूष्प देऊन स्वागत** दोडाईचा (मुस्तूफा शाह)




*धनगर समाज जातीय सलोखासाठी एक पाऊल पुढे* 
**गरीब नवाज वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष नबुदादा पिंजारी यांनी केले गुलाब पूष्प देऊन स्वागत** 
दोडाईचा (मुस्तूफा शाह) 

दोंडाईचा शहरात ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. धनगर समाजातर्फे भरगच्च कार्यक्रम आयोजित होते. राणीपुरा मातृत्व चौक येथे अहिल्यादेवीच्या स्मारकाचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले माणुसकी धर्म सर्वात मोठा धर्म असतो यासाठी भव्य रक्तदान शिबीर घेतले आणि संध्याकाळी शोभायात्रा अर्थात मिरवणूक काढली मिरवणूकीचा मार्ग पिंपळ चौक, आझाद चौक, गाव दरवाजा एकता चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्ग गोपालपुरा येथे समारोप करण्यात आला. मिरवणूक एकता चौक जामा मशिद रस्त्यावरुन जाते तेव्हा त्याठिकाणी तणावाचे वातावरण तयार होते. शहरात कोणत्याही मिरवणुका असो ह्या मशिद मार्गाने जातात पोलीस बंदोबस्त असतो तरीही तरुण मुलांच्या अंगात जोश भरतो त्यामुळे तणावासारखी परिस्थितीचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज होती. धनगर समाजाने एक पाऊल पुढे येऊन ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या भव्य मिरवणूक सुरु असतांना मशिद जवळ आल्याने तरुणांमध्ये जोश भरला तर तणावाचे वातावरण होईल म्हणून धनगर समाज आणि उत्सव समितीच्या पदाधिकारींनी पुढाकार घेऊन मुस्लिम धर्मीयांचा भावनेचा विचार करुन मशिद जवळ पाच मिनिटे वाजंत्री ढोल पथक बंद करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार पर्यंत शोभायात्रा मिरवणूक शांततेत काढून घेतली आणि पुन्हा वाजतगाजत पुढे मार्गक्रम झाली समितीचे अध्यक्ष समाधान दत्तू लांडगे उपाध्यक्ष समाधान दगडू पवार, खजिनदार महेंद्र अशोक मुजगे, सचिव दगडू शिवाजी धनगर, सदस्य योगेश संतोष लांडगे, विनोद बाबूलाल पवार, सुभाष निंबा बोरसे, प्रल्हाद भटू लांडगे, योगेश काशिनाथ मुजगे, गुलाब एकनाथ लांडगे, अशोक छगन आडगाळे, वाल्मिक नामदेव बोरसे, सुभाष मोतीराम लांडगे यांच्या सह धनगर समाजाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे. तेव्हा मुस्लिम समाजानेही पुढाकार घेतला गरीब नवाज वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष नबुदादा पिंजारी यांनी हिंदू, मुस्लिम धर्मीयात जातीय तणाव होऊन नये नेहमी सलोखा ला एकोप्याने राहावे म्हणून मशिद जवळ पाच मिनिटे वाजंत्री बंद करुन घेतल्याने भविष्य कधीही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून गुलाबाचे फुल देऊन धनगर समाज व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. अहिल्यादेवी होळकर या लोकमाता आहेत त्यांचे कार्य लोकांसाठी आहे. अशा अहिल्या मातेची जयंती आनंदात आणि उत्साहात साजरी झाली पाहिजे यासाठी धनगर समाज आणि उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेले प्रेम विसरतात येणार नाही धनगर समाजाने नवीन आदर्श परंपरा सुरु केली आहे. हा मार्ग बंद करता येणार नाही परंतु पाच मिनिटे मशिद जवळ वाजंत्री बंद करुन घेतली तर कधीही कुठेही हिंदू, मुस्लिम वाद होणार नाही. यासाठी कोणत्याही मिरवणूका असो त्यांनीही पुढाकार घेतला तर आनंद होईल असे गरीब नवाज वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष नबुदादा पिंजारी यांनी सांगितले. यावेळी मनोज तेले, शैलेश बोरसे, संदीप धनगर, ईस्माईल बशीर, आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने