*दोंडाईचा शहरातील विजपुरवठा सुरळीत करा*
भाजपा शहराध्यक्ष
प्रविण महाजन
दोंडाईचा (अख्तर शाह)
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी में महिन्याचा उन्हाळा प्रचंड कडक असुन वातावरणातील आर्द्रता देखील वाढली आहे त्यामुळे घराघरातील वातानुकूलित यंत्रणा सुरू केल्याशिवाय गत्यंतर नाही यामुळे थोडाफार दिलासा मिळत आहे परंतु विज वितरण कंपनीने गेल्या महिनाभरापासून विजेचा लपंडावाचा खेळ सुरू केला असुन भरदुपारी तथा रात्री अपरात्री विजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे त्यामुळे आबालवृद्ध नागरीकांना प्रचंड मनस्ताप होत आहे तरी विज वितरण कंपनीने विजपुरवठा सुरळीत करावा तसेच मान्सुनपुर्व देखभाल दुरुस्तीचे कामे लवकरात लवकर करुन घ्यावीत त्यात लोबंकळलेल्या तारा योग्य ताण देऊन ओढुन घेणे उघड्यावरील डि पी ना झाकणे बसवून वाकडे तिरपे विद्युत पोल सरळ करणे तथा नविन बसवीणे तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या काढून घेणे इ कामे पावसाळ्यापुर्वी गरजेचे असु़न ती त्वरित करुन घ्यावीत जेणेकरून ऐन पावसाळ्यात विजपुरवठा खंडीत होणार नाही असे निवेदन शहराध्यक्ष प्रविण महाजन यांनी दोंडाईचा विज वितरण कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अभियंता राजानंद मोटघरे यांना दिले त्यांनी निवेदन स्विकारीत वेळी -अवेळी विज पुरवठा खंडीत होण्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत सांगितले कि मागील आठवड्यात अचानक आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडांमुळे विद्युत पोल पडले तारा तुटल्या होत्या तसेच १३२ के.व्ही.सबस्टेशनमधिल रोहित्र पुर्णपणे जळुन खाक झाले होते त्यामुळे दोंडाईचा शहरातील स्टेशन भाग व काँलनी परिसरातील विज पुरवठा ग्रामीण भागातील २२० के.व्ही स्टेशनवर तात्पुरता टाकण्यात आला होता म्हणुन अचानक विजेचा दाब वाढल्यास विजपुरवठा आपोआप खंडीत होत होता परंतु शहराचे स्वतंत्र रोहित्रची दुरुस्ती झाली असुन लवकरच विजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करण्यात येईल तसेच मान्सुनपुर्व सर्व कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले याप्रसंगी व्यापार आघाडीचे संजय अग्रवाल भरतरी ठाकुर अनिल सिसोदिया कांतीलाल मोहिते सचिन मराठे अक्षय चव्हाण बन्टी नेतले मनोहर कापुरे अशोक गिरासे पंकज चौधरी मच्छिंद्र मराठे इ पदाधिकारी उपस्थित होते.