तुळजापूर ओसा टोल नाका येथे कामगारांवर अन्याय, कामगारांना कामावर घेऊन गुन्हा दखल करण्याची पोलीस अधीक्षक यांच्या कडे मागणी

 






तुळजापूर - 


तुळजापूर ओसा टोल नाका येथे दोन कामगारांवर  टोल कंपनीच्या कंत्राट दाराने अन्याय  केला असून बेकायदा दोन कामगारांना कामावरून काढले आहे व कंपनी नियमाच्या भंग करून पी एफ भरणा केला नाही म्हणून  गुन्हा दखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षक सो लातूर यांच्या कडे मागणी

 मागणी करण्यात आली आहे.


याबाबत प्रहार कामगार संघटना महाराष्ट्र चे  कार्याध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ता गणेश रघुनाथ वाडेकर यांनी प्रशासनात विविध ठिकाणी तक्रार सादर करून याबद्दल कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याबाबत व कामगारांवरील अन्याय दूर करून त्यांना पुन्हा कामावर घेण्याबाबत तक्रारीतून मागणी करण्यात आली आहे.


सदरच्या तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण च्या कार्यक्षेत्रातील निविदा प्रक्रिया अनुसार तुळजापूर औसा टोल नाक्यावरील D.R.Services (राजकुमार ढाकणे) यांना कलेशन जमा करण्या साठी निविदा (कॉन्ट्रॅक्ट) दिली आहे. कॉन्ट्रैक्ट हे कामगार कायदे MRTP PULP कायदा १९७१ नुसार अनुचित कामगार प्रथेचा अवलंब केला जातो व  यात नियमांचे उल्लंघन झाल्यास IPC UNDAR SECTION दंडनीय विश्वासघात (CRIMINAL BRECH OF TRUST) 406, 420, 506 याप्रमाणे दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रोविजन आहे.


सदर टोल नाक्यावरील कारभारात कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून वरील कायद्याचे देखील उल्लंघन होत आहे व मनमानीपणे कामगार कायद्याचे उल्लंघन करून स्वताचा मर्जी प्रमाणे बेकायदेशीर धोरणाचा वापर करीत आहे.


या कंपनीने जुलै २०२२ परियत PF भरला असून ऑगस्ट २०२२ तर आज पर्यंत कामगाराच PF भरलेला नाही . त्यामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होत असून कामगाराचा विश्वासघात केला जात आहे.  येथे कामगाराना D.R. Services (राजकुमार ढाकणे) ह्या कंपनी ने दिलेला पगार १७ जानेवारी २०२२ पासून तर आज पर्यंत

 कामगार मंत्रालय F.No. 1/16 (3) / 2022-25-11 नुसार ठरवून दिलेल्या पगारातील फरख २७,५५,३२२/-  काढला आहे. याबाबत जाब विचारला असता या कारणाने दोन कामगाराना कंपनीने बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकण्यात आले आहे . या नोकरी वरच दोघे कामगाराचा उदरनिर्वाह होत असून कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे कामगारांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे .


बेकायदेशीर कामावरून काढलेल्या कामगारांची नावे गजेंद्र सुधीर पवार तालुका जिल्हा लातूर व सचिन नामदेव लांडगे तालुका जिल्हा लातूर अशी आहेत.


तुळजापूर-जीमा टोल प्लाझा येथील 42 कामगार सण-२०१९पासून कार्यरथ असून त्या कामगारांना आज पावतो minimum wages सेंट्रल लेबर मिनिट्टी ने ठरवून दिलेल्या प्रमाणे पगार मिळत नसून (F.No. 1/16(3) / 2022-LS-1.) मा. लेबर कमिश्नर सो नागपूर यांच्या कडे तक्रार करता गणेश रघुनाथ वाडेकर प्रहार टोल कामगार महाराष्ट्र कार्याध्यक्ष स्वतः संघटनेच्या माध्यमातून कामगारावर मालकाकडून (ठेकेदाराकडून होणाऱ्या अन्यायविरुद्ध न्याय मागत असल्याने मा. लेबर कमिश्नर सो नागपूर यांच्याकडे दाद मागत 05.01.2023 रोजी ११.३० सकाळी मिटिंग लावली असता त्या मिटिंग साठी गजेंद्र सुधीर पवार (शिफ्ट) व सचिन नामदेव लांडगे (टोल कलेक्टर) नागपूर लेबर कमर ऑफला येथे मिटिंग साठी निघाले असता २५.११.२०१२ रोजी .1 PM च्या दरम्यान हनीफ आयटी (GEN MANEGAR) जीसा टोल प्लाझा यांनी गजेंद्र पवार अर्जदारास फोन केला कि तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नये मालकाने तुम्हाला कामावरून काढण्यात आले आहे असे सांगितले असता दुसऱ्या दिवशी ०१.१२.२०१२ रोजी टोल प्लाझावर गजेंद्र व सचिन यास ड्युटी करण्यास सांगितले ४ ते ५ तास नंतर तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात आले असून नागपूर लेबर कमिशनर यांच्या कोर्टात सुरू असलेल्या केसमधील निकाल लागेपर्यंत तुम्ही कामावर येऊ नये

 असे दिलीप कुमार ढाकणे D.R. Services चे रोल मैनेजर यांनी सांगितले


अशिव टोल प्लाझा वरील कामगार कामगाराचे प्रतिनिधित्व करीत असलेले गजेंद्र पवार व सचिन लाड  होते त्यांना या ठेकेदारांनी जाणूनबुजून कामावरून काढून टाकले आहे तसेच या ठेकेदाराच्या बेकायदेशीर कृत्या विरुद्ध ज्यानी व ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरुद्ध आवाज उचलण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या कामगारांना काहीच कारण नसांगता कामावरून काढून टाकले आहे. कामगारांना काढताना नैसर्गिक न्यायानुसार कामगारांना त्याची बाजू संधी दिली नसून, अशाप्रकारे नियोक्ता MRTP आणि PULP कायदा 1971 चा भंग केला आहे.


त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की सदर तक्रारीबाबत आपण गांभीर्याने लक्ष देऊन पीएफ बद्दल झालेल्या अपहरण बद्दल कंपनी व्यवस्थापनावर आर्थिक व्यवहाराच्या गुन्हा दाखल करून कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश देऊन कामगारांना न्याय द्यावा अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने