शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील बोराडी सांगवी रस्त्यावर बनावट दारू तयार करण्याच्या उद्देशाने लागणारे स्पिरिट याची चोरटी वाहतूक होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बापूसाहेब महाडिक सीमा तपासणी नाका हाडाखेड यांना प्राप्त झाली होती.
त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली असता संशयित वाहन व मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा
सांगवी-बोराडी रस्त्यावर शुद्ध मद्यार्काची ( स्पिरीट) वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक बातमी नुसार दिनांक 20/12/2022 रोजी सांगवी - बोराडी रस्त्यावर बोराडी शिवार बोराडी ता. शिरपूर जि. धुळे येथे सापळा लावून समोरून संशयित वाहन क्र. MH 01 AP 2006 हे येत असल्याचे दिसले त्यास थांबविण्याच्या इशारा केला असता. सदर वाहनाच्या वाहनचालकाने सदर वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले सदर वाहनाची तपासणी केली असता. सदर वाहनाच्या मागील बाजूस दोन 250 लिटर क्षमतेचे निळ्या रंगाचे प्लास्टीक ड्रम स्पिरीटने (शुद्ध मद्यार्क) भरलेले दिसून आले. सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव कैलास धुरसिंग पावरा रा.. सामन्यापाडा ता. शिरपूर जि. धुळे. असे सांगितले सदर इसमास जागीच अटक केली. सदर इसमाच्या ताब्यातून स्पिरीटसह वाहन असे एकूण रु.2,64,000/- अंदाजे किंमतीचा मुद्देमाल दारूबंदी गुन्ह्याखाली गु.र.न 02/2022 दिनांक 20/12/2022 नुसार जप्त करून सदर वाहनावर व वाहनचालक/मालक यांचे विरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे ही वाचा
सदरची कारवाई मा. डॉ. विजय सूर्यवंशी साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्री. सुनिल चव्हाण साहेब संचालक ( अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्री. अर्जुन ओहोळ साहेब विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक, मा. श्री. मनोज शेवरे साहेब अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सीमा तपासणी नाका हाडाखेड ता. शिरपूर जि. धुळे श्री. बापूसाहेब महाडीक निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. सीमा तपासणी नाका हाडाखेड, श्री. एस.एस. हांडे निरीक्षक, शिरपूर श्री. सागर चव्हाण दुय्यम निरीक्षक, श्री. एस.एस. गोवेकर श्री. ए. बी. निकुंबे स.दु.नि. व श्री. शांतीलाल देवरे श्री. केतन जाधव, श्री. प्रशांत बोरसे, श्री. मनोज धुळेकर, जवान तसेच वाहन चालक श्री. रवींद्र देसले यांचे पथकाने सदरची कारवाई केली असून पुढील तपास श्री. बापूसाहेब महाडीक निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका हाडाखेड ता, शिरपूर, जि. धुळे, हे करीत आहेत.
