शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात संपन्न झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत या टप्प्यात तालुक्यातील १७ ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर झाला होता त्यानुसार तालुक्यातील बोराडी ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध जाहीर करण्यात आली होती त्या पंचायतीवर भाजपचे राहुल रंधे यांचे वर्चस्व आहे.
उरलेल्या 16 ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर आज दिनांक 20 डिसेंबर रोजी 16 ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिरपूर तहसील कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार आबा महाजन यांच्या नियंत्रणाखाली ग्रामपंचायतची मतमोजणी संपन्न झाली. त्यात सर्वच सर्व ग्रामपंचायत या आमदार अमरीश भाई पटेल व भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी व समर्थकांनी विजय मिळवला असून तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर पुन्हा आमदार अमरीश भाई पटेल यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवण्यात भाजपाला यश आले आहे.
याबाबत आमदार अमरीश भाई पटेल यांनी देखील आपली प्रतिक्रिया जाहीर केली असून सर्व शिरपूर तालुक्यातील जनता यांनी आमदार अमरीश भाई पटेल यांचे नेतृत्व मान्य केले असून त्यांच्या नेतृत्वात तालुका पूर्णपणे भाजपमध्ये झाला असून या निवडणुकीत काही ठिकाणी विरोधात उभे राहिलेले पदाधिकारी देखील भाजपचेच होते. त्यामुळे सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतींवर भाजप समर्थक पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. त्यामुळे भाजपवर विश्वास दाखवल्यामुळे आमदार अमरीश भाई पटेल यांनी जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.
तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचांची यादी


