ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा (प्र.न. )ता. शिंदखेडा जि. धुळे येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय मुख्याध्यापिका श्रीम. पी.पी .महिरे- वाघ यांच्या मार्गदर्शनाने व ज्येष्ठ शिक्षक श्री. ए.के .सावंत व उपक्रमशील शिक्षिका श्रीम. मंगलाताई कुवर यांच्या सुयोग्य नियोजनाने संपन्न झाले. देव दगडात नाही माणसात आहे, ग्राम स्वच्छता, आरोग्य व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक श्री. एन.पी. भिलाणे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून निपुण भारत उपक्रम अंतर्गत आजच्या दुसऱ्या पुष्पाचे गुंफण करताना मार्गदर्शन केले .
याप्रसंगी ग्राम स्वच्छता व गणितीय परिपाठ यांचे आयोजन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. सी. झेड. कुवर, उपक्रमशील शिक्षक श्री. पी.एच. लांडगे व नितीन पाटील यांनी केले.
भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा 22 डिसेंबर जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन दिनांक 19 डिसेंबर 2022 ते २२ डिसेंबर 2022 या कालावधीत विद्यालयात गणितोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्यात गणित परिपाठ, गणितीय रांगोळी ,चित्रकला स्पर्धा, फलक लेखन, प्रश्नमंजुषा स्पर्धा, गणित जत्रा ,गणित मेळावा व गणितीय शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन विद्यालयात गणित शिक्षक श्री. एन.पी. भिलाने यांच्या मार्गदर्शनाने आयोजन करण्यात आलेले आहे .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री जितेंद्र राजपूत, चुडामन नाना धनगर मेहनत घेत आहेत.
