ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा (प्र.न. )ता. शिंदखेडा जि. धुळे येथे संस्थेचे चेअरमन डॉ.बापूसाहेब रवींद्र देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त व निपुण भारत अभियान अंतर्गत गणितोत्सवाचे आयोजन विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय मुख्याध्यापिका श्रीम. पी.पी .महिरे- वाघ यांच्या मार्गदर्शनाने व ज्येष्ठ शिक्षक श्री. ए.के .सावंत व उपक्रमशील शिक्षिका श्रीमती मंगलाताई कुवर यांच्या सुयोग्य नियोजनाने मोठ्या उत्साहात संपन्न झाले. गणित जीवनाचा पाया आहे या विषयावर विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक श्री. एन.पी. भिलाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला, स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा यांचे आयोजन उपक्रमशील शिक्षक श्री. पी.एच. लांडगे व नितीन पाटील यांनी केले.
भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा 22 डिसेंबर जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन दिनांक 19 डिसेंबर 2022 ते २२ डिसेंबर 2022 या कालावधीत विद्यालयात गणितोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्यात गणित परिपाठ, गणितीय रांगोळी ,चित्रकला स्पर्धा, फलक लेखन, प्रश्नमंजुषा स्पर्धा, गणित जत्रा ,गणित मेळावा व गणितीय शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन विद्यालयात गणित शिक्षक श्री. एन.पी. भिलाने यांच्या मार्गदर्शनाने आयोजन करण्यात आलेले आहे .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री जितेंद्र राजपूत नाना धनगर मेहनत घेत आहेत.
