चुलत काकाचा अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने खळबळ प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:पुण्यातील उरळी कांचन येथे चुलत काकाने आपल्या अल्पवयीन पुतणीवर चार महिन्यांपासून अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित मुलगी १३ आठवड्याची गर्भवती राहिल्यानंतर ही बाब समोर आली आहे. पीडित तरुणी ही उसतोड कामगार आहे, पोलिसांनी आरोपी काकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरळी कांचन येथील कॅनलच्या कडेला उसतोड कामगारांची घरं आहेत. पीडित तरुणी कुटुंबियांसोबत राहत असताना, ऑक्टोबर २०२१ मध्ये तिच्या आरोपी काकाने तिला घराबाहेर बोलवून धमकी देत लैंगिक अत्याचार केले. घाबरलेल्या मुलीने याबद्दलची माहिती आपल्या घरच्यांना दिली नाही.

तीन महिन्यांनी पीडित मुलीला त्रास जाणवायला लागल्यानंतर तिला उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांनी ती १३ आठवड्यांची गर्भवती असल्याचं सांगितलं. यानंतर पीडित मुलीच्या घरच्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपी काकाचा शोध घेत आहेत. आरोपी हा मुळचा जालना जिल्ह्याचा रहिवासी असून तो उसतोड कामगार असल्यामुळे त्याचा शोध घेणं पोलिसांना आव्हानात्मक होऊन बसलं आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने