पत्रकारांवर विनाकरण खोटे गुन्हे नोंदवू नये, जिल्हा पत्रकार संघाचे एसपींना निवेदन



शिरपूर प्रतिनिधी /= संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांवर आकसापोटी खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. त्यामुळे विनाकारण कुठल्याही प्रकरणात पत्रकारांना गोवण्यात येवू आहे. या प्रकाराचा योग्य तो तपास करून निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हा पत्रकार संघाने केली आहे. याबाबत आज पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांची भेट घेत निवेदन देण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, रविंद्र इंगळे, अतूल पाटील, मनोज गर्दे, विशाल ठाकुर, पुरुषोत्तम गरूड, महेंद्र राजपुत, सतिष पेंढारकर, संतोष ताडे, नाना शिरसाठ, सुनिल निकम, पवन मराठे, रविंद्र नगराळे, सोपान पाटील, गोरख गर्दे, विजय डोंगरे, संजय पाटील, अखिल भारतीय पत्रकार संघाचे जीवन शेंडगे, राजेंद्र गुजराथी, गोपाळ कापडणीस, होते. यावेळी चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले की, साक्री येथे एका महिलेचा खून झाला. ही अंत्यत दुर्देवी घटना आहे. या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झालीच पाहीजे. परंतू या दरम्यान काही पत्रकार वृत्तसंकलनासाठी गेले असता त्यांचेही नाव बळजबरीने टाकण्यात आले, तसेच शिरपूर येथील दैनिक समाज शक्तीचे संपादक ईश्वर बोरसे यांच्यावर १७ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता चहा पीत असताना पंचायत समितीतील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ईश्वर बोरसे वर प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्यात त्यांना डोक्याला मार लागला आहे  तसेच पोलिसांनी कुठल्याही प्रकाराची चौकशी न करता पत्रकारावरच खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करून एक प्रकारे पत्रकारांवर अन्यायच केला आहे तरी साक्री येथील मोरे व शिरपूर येथील ईश्वर बोरसे यांच्यावर करण्यात आलेला खोटा गुन्हा त्वरित रद्द करण्यात यावा व पत्रकारांना या प्रकरणात गोवण्यात येवू नये. कारण पत्रकार बातमी संकलनासाठी नेहमी फिल्डवर असतात. जर आकसापोटी कोणी पत्रकाराचे नाव घेत असेल तर हा पत्रकारांवर अन्याय आहे. अशा प्रवृत्तींना हाणून पाडले पाहीजे. जर अशा प्रकार पत्रकारांवर गुन्हे दाखल होत असतील तर ग्रामीण भागात काम कसे करावे, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला आहे. असे गुन्हे दाखल होत असल्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांमध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या घटनेचा योग्य तो तपास करून निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने