शिरपुर जि. धुळे (प्रतिनिधी) : देशाचा विकास करायचा असेल तर सामाजिक एकता, अखंडता व शांतता महत्वाची आहे. कायदा, सुव्यवस्था, शांतता राहिल्याने शासन व प्रशासन यांना विकासकामांसाठी मुबलक वेळ मिळताे. तर विविध शासकीय याेजना ग्रामपातळीवर लवकर पाेहचतात. महर्षी वाल्मिकी यांनी रामायनातुन प्रभु रामचंद्र यांची गाथा, आदर्श, संस्कार सांगितले आहेत. युवकांनी त्यांनी दिलेला आदर्श आचरणात आणावा. महान व्यक्ती राष्ट्रपुरुष यांची जयंती साजरी केल्याने युवा पिढीला प्रेरणा मिळते. प्रत्येक व्यक्ती देशाच्या विकासासाठी महत्वाचा आहे. तरूण पिढीने चांगले शिक्षण घ्यावे. वाचन करावे. व्यसनाच्या आहारी जावु नये. तर कुठल्याही प्रकारचा जातीभेद करू नये. तंटामुक्ती गाव म्हणजे गाव विकासाची पहिली पायरी आहे. पिंप्री आदर्श गाव असुन कष्टाळू शेतकरी आहेत. असे मत महर्षी वाल्मिकी जयंती प्रसंगी पाेलिस उपविभागीय अधिकारी अनिल माने यांनी मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
पिंप्री ता. शिरपुर येथे दि. २० रोजी सायंकाळी ६ वाजता सामाजिक सभागृहात "महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती" यांच्या वतीने प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हाेता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाेलिस उपविभागीय अधिकारी शिरपुर विभाग अनिल माने, प्रमुख पाहुणे म्हणून थाळनेरचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक उमेश बाेरसे, पाेलिस उपनिरीक्षक कृष्णा पाटील तर व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य विजय खैरनार, सावळदे उपसरपंच सचिन राजपूत, कुरखळी पाेलिस पाटील वसंत बिल्हाडे, पिंप्रीचे सरपंच महेंद्र गिरासे, पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे, उपसरपंच संजय काेळी, धनंजय शिरसाठ आदी उपस्थित हाेते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रामायण या महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर उपविभागीय अधिकारी अनिल माने यांनी गावाचा कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
याप्रसंगी अनिल माने यांनी पुढे मार्गदर्शन करतांना सांगितले की, राष्ट्रपुरुषांना जाती जाती मध्ये विभागुन लहान करू नका. राष्ट्रपुरुष हे राष्ट्राचे दैवत असुन कुठल्याही एका समाजासाठी त्यांनी काम केले नाही. त्याचे काम राष्ट्रासाठी असते समस्त मानवजातीसाठी आहे. असे उपविभागीय अधिकारी अनिल माने यांनी सांगितले.
तर थाळनेरचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक उमेश बाेरसे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, महर्षी वाल्मिकी यांनी रामायणाची रचना करून मानवजातीला सत्य, कर्तव्य, व जिवन जगण्याचा मार्ग दिला आहे. ताे मार्ग आपण सर्वांनी आत्मसाद करावा असे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिंप्री येथील जेष्ठ नागरिक श्रावण काेळी, भगवान गिरासे, तर केशव काेळी, संजय काेळी, भारत राजपूत, किशोर पाटील, रणजित गिरासे, जितेंद्र काेळी, भिका काेळी, दिलीप काेळी, संजय धनगर, याेगेंद्र पाटील, श्री.राजपूत करणी सेना शिरपुर तालुका अध्यक्ष अनिल गिरासे, प्रहार जनशक्ती पक्ष तालुका उपाध्यक्ष मनाेज राजपूत, अरविंद काेळी, नरेश काेळी, महेंद्र धनगर, यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पिंप्रीचे पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी केले. तर आभार भारतसिंग राजपूत यांनी मानले.
पिंप्री ता. शिरपुर येथे महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्यात आले यावेळी पाेलिस उपविभागीय अधिकारी अनिल माने, सहाय्यक पाेलिस निरीक्षक उमेशजी बाेरसे, पाेलिस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, पिंप्रीचे सरपंच महेंद्र गिरासे, पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे, सावळदे सरपंच सचिन जाधव, धनंजय शिरसाठ, कुरखळी पाे.पा.वसंत बिल्हाडे, पिंप्री येथील श्रावण काेळी भगवान गिरासे, पं.स. सदस्य विजय खैरनार, केशव काेळी, संजय काेळी,भारत राजपूत, किशोर पाटील, जितेंद्र काेळी, भिका काेळी, अनिल राजपूत, मनाेज राजपूत, अरविंद काेळी, नरेश काेळी आदी. उपस्थित होते.
Tags
news
Thank you dada
उत्तर द्याहटवा