शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील रेशन दुकानदारांवर तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाने गुन्हा दाखल केल्याने रेशन दुकानदार आणि मध्ये खळबळ माजली आहे. काल दिनांक 3 सप्टेंबर रोजी पुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुक्यातील चांदपूरी येथील दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब अंतर्गत लाभार्थ्यांना धान्य वाटप न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रेशन मालाचे धान्य काळ्याबाजारात जाऊन विक्री करण्याच्या आरोपावरून तालुक्यातील चांदपूरी येथील दुकानदार मन्सूर आरिफ मेमन दुकान क्रमांक 50 यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदर दुकानदाराने धान्याची काळ्याबाजारात विक्री केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार आबा महाजन पुरवठा, अधिकारी मायानंद भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पुरवठा अधिकारी अपर्णा वडुडकर ,पुरवठा निरीक्षक अधिकारी पी बी सोमलकर ,मंडळ अधिकारी व तलाठी यांनी शहानिशा केली असता दुकानातून 95 हजार 350 रुपये किमतीचे 37 क्विंटल गहू ,80 हजार 460 रुपये किमतीच्या 26.82 क्विंटल तांदूळ, 989 रुपये किमतीचे 66 किलो साखर असा एकूण 1 लाख 37 हजार 790 रुपये किमतीच्या 55 क्विंटल 16 किलो रेशन धान्य माल लाभार्थ्यांना वाटप न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काळ्याबाजारात विक्री केल्याचे आढळून आले. त्यामुळे तहसीलदार आबा महाजन यांनी तातडीने कठोर कारवाईचा निर्णय घेत अधिकाऱ्यांना कायदेशीर गुन्हा दाखल करणे बाबत कारवाई करण्याचे सांगितल्यानंतर पुरवठा अधिकारी यांच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख करत आहे.
खुपच योग्य निर्णय.मा.तहसिलदार सो.व टीमचे अभिनंदन. 👍🙏🌹🌹🌹🌹🌹
उत्तर द्याहटवा