दोंडाईचा येथे नयनवृक्ष वनराई अभियानाअंतर्गत वृक्षारोपण व पथ दिव्यांचे भूमिपूजन समारंभ संपन्न *🔹विशाल रवींद्र बागल* *🔹शिंदखेडा तालुका प्रतिनिधी*




*🔹विशाल रवींद्र बागल*
*🔹शिंदखेडा तालुका प्रतिनिधी*


     शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे शुक्रवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी नयना वृक्ष वनराई अभियानाअंतर्गत राजपथ मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा 251 जोडप्यांच्या हस्ते वृक्षारोपण व पथदिव्यांची भूमिपूजन समारंभ माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

दोंडाईचा येथे पर्यटन विभागाच्या माध्यमातून 16 कोटींपेक्षा अधिकचा निधीतून साकारलेल्या राजपथ मार्गावर नगरपालिकेच्या वतीने नयना वृक्ष वनराई अभियानाअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा व मध्यभागी 251 जोडप्यांच्या हस्ते फुलांच्या शोभिवंत वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले व पथदिव्यांचे भूमिपूजन माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर वृक्षारोपण व भूमिपूजन समारंभ दोंडाईचा वरवाडे नगरपालिकेच्या वतीने  आयोजित करण्यात आला होता.. 
याप्रसंगी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल लोकनियुक्त नगराध्यक्ष नयन कुवर रावल पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम उपनगराध्यक्ष नबु पिंजारी भाजपा प्रवीण महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने