महारक्तदान शिबीराचा जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते उद्घाटन
*दोंडाईचा (प्रतिनिधी)* : राज्यात कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी ''माझे कुटूंब माझी जबाबदारी'' अभियानाअंतर्गत दोंडाईचा येथे शिवसेना-युवासेनेतर्फे शिवसेना कार्यालय येथे महारक्तदान शिबीर संपन्न झाले. शिबीराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी केले. यात 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-19 ची परिस्थिती आटोक्यात येत आहे. या कठीण परिस्थितीत राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी ''माझे कुटूंब माझी जबाबदारी'' अंतर्गत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, राज्याचे पर्यटन मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेतर्फे रविवारी शिंदखेडा विधानसभा मतदार संघात, प्रभु श्रीराम मंदीर, दोंडाईचा येथे सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळेत महारक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबीराचे उद्घाटन शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते संपन्न झाले. या महारक्तदान शिबीरात 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
याप्रसंगी शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज गोरे, उपतालुकाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, तालुका प्रमुख गिरीश देसले, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, दोंडाईचा शहरप्रमुख चेतन राजपुत, युवासेनेचे आकाश कोळी, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, शहर संघटक राकाशेठ रुपचंदाणी, आबा चित्ते, विजय वाडीले, चुडामण बोरसे, दिपक आण्णा मराठे, सोनु कोळी, उपशहरप्रमुख दिपक मराठे, संभाजी निकम, आकाश चौधरी, चेतन साबळे, अजय विसावी, देवेंद्र अहिरे, गोलु सदाराव, युवराज वानखेडे, सागर पवार, राहुल राजपुत, भाऊसाहेब ठाकूर, अमोल ठाकूर, नितीन पाटील, नितीन माळी, जगदीश पाटील, विश्वजीत राजपुत, प्रणव सुतारे, विनीत पाटील, भारत कोळी, रोशन सोलंकी, आण्णा कोळी, अनिल कोळी, वैभव बांगरे, हेमराज चौधरी, भटु कोळी, सुनिल पारधी, सुकदेव बागुल, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल माणिक, शहरप्रमुख बापुजी मिस्तरी, काँग्रेसचे वसंत चित्ते आदी उपस्थित होते.
Tags
news

फार सुंदर न्युज पोर्टल आहे
उत्तर द्याहटवा