शिरपूर - शिरपूर शहरातील रहिवासी व अहिल्यापूरच्या सुकन्या व वाठोडे गावाच्या सुनबाई सौ मनिषा जयपालसिंह गिरासे (जि.प. प्राथ. शिक्षिका) यांनी इंग्रजी साहीत्य विषयात NET EXAM 20 मध्ये तब्बल 94. 35 % गुण प्राप्त करत यश प्राप्त करून एक नवा विक्रम स्थापन केला . यापूर्वी इंग्रजी विषयात SET परिक्षा त्या उत्तिर्ण आहेत. त्यांनी इंग्लंडमधील कँब्रिज विद्यापिठातून TKT व हैदराबाद येथिल EFLविद्यापिठातून PGDTE च्या पदव्या गुणवत्ता श्रेणीत प्राप्त केलेल्या आहेत . त्याचसोबत इतर अनेक पदव्या सुध्दा त्यांनी मिळविलेल्या आहेत.
सध्या MSCERT ,PUNE येथे 'आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षात' इंग्रजी विषयतज्ञ म्हणून प्रतिनियुक्तिवर आपली जबाबदारी त्या सांभाळत आहेत.
महाराष्ट्र शासनाद्वारे राबविल्या गेलेल्या Spoken English Programme या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या स्टेट ambecdar अ तर British Council साठी राज्यस्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहीलेले आहे.
सौ मनिषा गिरासे ह्या सुप्रसिध्द व्याख्याते व लेखक राजपूत समाजाचे अभ्यासक श्री जयपालसिंह गिरासे यांच्या सुविद्य धर्मपत्नी आहेत.
सौ. मनिषा गिरासे यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे राज्याचे संचालक, उपसंचालक तसेच विविध विभागप्रमुखांमार्फत सत्कार करण्यात आला. त्याचेवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सौ मनिषा ताई चे निर्भीड विचार न्युज परिवार व करणी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या कडून शुभेच्छा व अभिनंदन .
Tags
news
