कोरोना काळात फायनान्स कंपनीची मनमानी कारभार सुरू असून कर्जदारांना वसुलीसाठी त्रास देवून सक्तीची वसुली केली जात आहे.त्यामुळे ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यात कोरोना या महामारी ने कहर केला आहे.मागील दोन महिन्यां पेक्षा अधिक काळ लॉक डाऊन व संचार बंदी मुळे सर्व सामान्य नागरिकांचे जण जीवन प्रभावित झाले असून सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.रोजगार बंद झाले आहेत. अर्थचक्र थांबले आहे. लोकांना जीवन कसे जगावे याची चिंता आहे. या परिस्तिथी चे भान ठेवून केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अर्थ मंत्री मा.निर्मला सीतारमन यांनी कर्जदारांना दिलासा देण्यासाठी मार्च 2020 ते ऑगस्ट 2020 पर्यंत सर्व बँक व वित्तीय संस्था यांना सक्तीची वसुली न करण्याचे आदेश केले आहेत. मात्र धुळे जिल्यात व शिरपूर तालुक्यात मायक्रो फायनान्स कंपनी, शॉर्ट टर्म पर्सनल लोण देणाऱ्या खाजगी कंपन्या, बचत गट , वाहन कर्ज, गृह कर्ज,मोबाईल लोण, व इतर लहान बाबी साठी कर्ज वितरण करणाऱ्या कंपन्या मनमानी कारभार करत असून ग्राहकाकडून सक्तीची वसुली करत आहेत.ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देता बँक खत्यातून परस्पर रक्कम वसूल करत आहेत.सरकारने केलेल्या घोषणा अनुसार लोकांनी हप्ते भरले नाहीत म्हणून या संस्थांनी लोकांच्या बॅँक खात्यातुन पॅनलटी चार्ज कापून घेतले आहेत. शिवाय हप्ते न भरणाऱ्या लोकांना फोन करून वसुली केली जात आहे. यात लोकांना हप्ते न भरल्यास अधीक व्याज व इतर चार्ज लावण्याची धमकी दिली जात आहे. या बाबत कंपनी कर्मचारी यांच्याशी विचारणा केली असता जे ग्राहक हप्ते न भरण्यासाठी कंपनी कडे अर्ज करून मागणी करत आहेत त्यांना च अशी सूट दिली जात आहे इतरांनाकडून मात्र वसुली होत आहे. मात्र कंपनीच्या वतीने या बाबत ग्राहकांना कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. किंवा कोणतीच पूर्व सूचना दिली नाही किंवा अर्ज कसा करावा या बाबत ग्राहकांना काही माहिती नाही .या बाबत कंपनीने कोणतेही कॉल किंवा संदेश पटवले नाही मात्र वसुली चे संदेश मात्र लोकांना प्राप्त होत आहेत .त्यामुळे या खाजगी कर्ज वितरण करणाऱ्या या कंपन्या मनमानी कारभार करत असून केंद्र सरकारने दिलेल्या आदेश पालन न करता मनमानी कारभार करत आहेत.आणी आपण आर.बी.आय पेक्षा मोठे आहोत असे दाखवत आहेत. वास्तविक पणे या कंपन्या ना लायसन्स देताना मर्यदित अधीकार दिले जातात. मात्र आता अधीकारांचा गैर वापर होत आहे.
मात्र निर्भीड विचार लोकांना आवाहन करत आहे की जर आपली अशी आर्थिक लूट होत असेल तर या बाबत आपण आपल्या बँक खात्याच्या पासबुक ची प्रत व आपल्या ओळ्ख पत्रासह या बाबत मा.जिल्हाधिकारी सो,उप विभागीय अधीकारी सो, तहसीलदार सो, यांचा कडे लेखी तक्रार करायची आहे. या बाबत अधिक लोक पुढे आल्यास जण आंदोलन उभे करून या बाबत अर्थ विभागात तक्रार केल्यास या कंपनीने लायसन देखील रद्द होऊ शकते. त्या मुळे नागरिकांनी घाबरून न जाता तक्रार करण्यास पुढे आले पाहिजे.
स्थनिक प्रशासनाने देखील या बाबती गांभीर्याने दखल घेत तालुक्यातील अश्या कंपनीना नोटीस बजावून सरकारी नियमांचे पालन करण्याबाबत सूचित केले पाहजे व नियम न पालन न करण्यावर कारवाही करून नागरिकांना दिलासा दिला पाहिजे अशी मागणी होत आहे.

बरोबर आहे साहेब.माझ्याकडून देखील पेनल्टी वसूल केली आहे.बजाज फायनान्स कंपनी बाबत माझी तक्रार आहे.
उत्तर द्याहटवा