शिरपूर - श्री विले पार्ले केळवणी मंडळ (एस.व्ही.के.एम.) एन. एम. आय. एम. एस. शिरपूर स्थित 'मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी पार्क' मुकेश पटेल टेक्नॉलॉजी पार्क येथे संस्था व संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानातून बुधवारी दि. 27 मे रोजी सकाळी 11:30 वाजता तसेच दिवसभरात एस. व्ही. के. एम. संस्थेचे ट्रस्टी तपनभाई पटेल यांच्या हस्ते असंख्य कर्मचारी यांना संपूर्ण कुटुंबासाठी जीवनावश्यक किराणा वस्तूंचे किटचे वितरण करण्यात आले. यावेळी शिरपूर कॅम्पसचे संचालक डॉ. आर. एस. गौड,
सोशल डिस्टनसिंगच्या सर्व नियमांचे पालन होण्याच्या दृष्टीने शेकडो कर्मचारी यांना दिवसभरात सर्व वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले. शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शिरपूर, सावळदे, बाभुळदे, कुरखळी, खर्दे बु., वर्षी, दभाशी, कमखेडा, पिंपरी, खर्दे पाथर्डे, गिधाडे, उप्परपिंड, सुकवद व इतर अनेक गावातील रहिवासी असलेल्या या कर्मचारी बंधू भगिनी यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला.
मदत करण्याच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद -
संपूर्ण जगभरात कोविड-19 या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. या मुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने साधारण आर्थिक परिस्थितीत जीवन व्यतीत करणारे हाऊसकीपिंग आणि सुरक्षा सेवा एजन्सीमधील बहुतेक कर्मचारी यांना सहकार्य करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला अतिशय कमी कालावधीत उत्तम प्रतिसाद देत सर्व कर्मचारी मदतीसाठी पुढे सरसावले. याचेच फलित म्हणून, लगेचच असंख्य गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे आज वाटप करण्यात आले.
