शिरपूर - शिरपूर तालुक्यातील अमोदा गावात कोरोना ने प्रवेश केल्यामुळे तालुक्यात खडबड माजली होती.त्यामुळे शिरपूर शहर सह परिसर कोरांटाइन करण्यात आला होता मात्र प्रशासणाच्या दक्षता व नागरिकांचे सहकार्य मुळे परिस्तिथी नियंत्रणात होती.दरम्यान सुदैवाने नवीन रुग्ण वाढ झाली नाही आता तालुक्यासाठी आनंद दायी बातमी आली असून धुळे येथील सात कोरोना मुक्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे...यात महिला रुग्णाचा देखिल समावेश आहे.या महिलात तालुक्यातील आमोदा येथील 2 महिलेचाही समावेश आहे. तालुक्यातील आई व मुलीला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यातील दोघांचा आज कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सुट्टी झालेली आहे.शिरपूर साठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
आज रात्री 10.30 वाजता दोन्ही रुग्ण सुखरूप घरी परतले असून गावकरी यांनी त्यांचे आरती व पुष्प ने स्वागत केले व गावावर आलेले संकट दूर झाले म्हणून आनंद व्यक्त केला. या वेळी तालूका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी व त्याचे सहकारी उपस्थित होते.
या मुळे किमान आता शिरपूर तालुका कोरोना मुक्त झाला असून या पुढे सर्व नागरीकांनी सावध राहून नियमाचे पालन करून साधनता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Very nice
उत्तर द्याहटवा