संपुर्ण जगावर आलेल्या संकटाच्या वेळी प्रशासनास मदत करून, लॉकडाऊन च्या सर्व नियमांचे पालन करत वीरशिरोमणी प्रातःस्मरणिय हिंदवा सूरज राष्ट्रगौरव श्री महाराणा प्रतापसिंहजी यांच्या 480 व्या जयंती निमीत्त एक आगळी वेगळी जयंती साजरा करण्याचा मानस शिवराणा ग्रुप तर्फे करण्यात आला आहे. समस्त शिवराणा ग्रुप मार्फत जेष्ठ व्याख्याते व राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह या ग्रंथाचे लेखक श्री जयपालसिंह गिरासे (शिरपुर) यांचे फेसबुकवर श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे बलस्थान/साम्य गुण या विषयावर लाईव्ह व्याख्यान ठेवले आहे. जगाच्या इतिहासात आपले नाव अजरामर करणाऱ्या दोन महान राजांच्या कर्तृत्वाची अनुभूती घेण्यासाठी, आपण खालील लिंक वर दिनांक 9 मे 2020 ला संध्याकाळी 7 वाजता भेट देऊन व्याख्यानाचा लाभ घ्यावा ही विंनती
तसेच रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत, दिनांक 9 मे 2020 रोजी सकाळी 10 वा. निर्णय ब्लड बँक, मालेगांव रोड, धुळ येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. कृपया रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवावा ही नम्र विंनती, समस्त शिवराणा ग्रुप मार्फत करण्यात आली आहे.
फेसबुक लाईव्ह लिंक खालील प्रमाणे
1) https://www.facebook.com/profile.php?id=100049699296571 (शिवराणा ग्रुप महाराष्ट्र)
2) https://www.facebook.com/jaypalsingh (Jaypalsingh Girase )
3) https://www.facebook.com/JaiGajanan (Tejpal Bharatsingh Girase)
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक-
1) तेजपाल गिरासे 9405809882
2) विकास भामरे 8208223201
