रेशनदुकाना जिल्हात दिवसभर सुरु ठेवाव्यात :अरुण धोबी धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांचाकडे मागणी




   शिरपूर : शासनाच्या आदेशानुसार केंद्र व राज्य सरकारने दिलेले नियम पाळुन गोर-गरीब नागरीकांसाठी शिधावाटप दुकाना जिल्हात सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवुन धान्य वितरण योग्य रीतीने व्हावे अशी मागणी भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांना (दि.८.मे) रोजी ईमेलने पाठवलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
   केंद्र व राज्य सरकारने आता लाॅकडाऊन १७ मे पर्यंत वाढविलेला आहे. या लाॅकडाऊनचा मोठा परिणाम हातावर पोट भरणारे हातमजुर, घरकाम करणार्‍या महिला, बांधकाम कामगार, रस्त्यावरील विक्रेते, लहान दुकानदार तसेच रिक्षाचालक, अल्प उत्पन्न असलेले नागरीक यांच्यावर झालेला आहे. असे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनाची प्रत शिरपूर तहसिलदार आबा महाजन यांना हि पाठवलेली आहे.
   पिवळे व केशरी प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना केंद्र सरकारच्या पतंप्रधान गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत तीन महिन्यांसाठी गोरगरीबांना ५ किलो अतिरिक्त तांदुळ मोफत देणार येत आहे. तसेच अन्न नागरी सुरक्षा योजनेमार्फत २ व ३ रु प्रती किलो गहु व तांदुळ मिळत आहे.
   या दरम्यान काही धान्य वितरक आपल्या मर्जीनुसार दुकान चालु व बंद ठेवत असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी आहेत. यामुळे नागरीकांमध्ये प्रशासना विरोधात तीव्र असंतोष निर्मान झालेला आहे व याचा उद्रेक केव्हाही होवुन जिल्हात कायदा सुव्यवेस्तेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कमी कालावधीसाठी शिधावाटप दुकान सुरु राहिल्या तर दुकानात नागरीकांची गर्दी होवुन धान्य खरेदी करतांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार नाही. म्हणुन शासनाच्या आदेशानुसार केंद्र व राज्य सरकारने दिलेले नियम पाळुन गोर-गरीब नागरीकांसाठी शिधावाटप दुकाना सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु असाव्यात व धान्य वितरण योग्य रीतीने होण्याबाबतच्या सुचना शिधावाटप अधिकारी व सर्व रेशन दुकानदार यांना देण्यात याव्यात अशी मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांचाकडे केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने