मालेगावचे कोरोना रुग्ण धुळ्यास पाठवू नका - राजवर्धन कदमबांडे यांची मागणी



धुळे , कोरोनाचे हॉट स्पॉट असलेल्या मालेगाव येथील पॉझिटिव्ह पेशंट धुळे येथे पाठवू नये , अशी मागणी माजी आ . राजवर्धन कदमबांडे यांनी केली आहे . 
   मालेगावचे पेशंट धुळ्यात हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले जात आहेत . त्यामुळे धुळे शहरातील विविध स्तरातील नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे . धुळे येथे आधिच रुग्णालयावर क्षमतेपेक्षा अधिक भार आहे . शिवाय मालेगावचे रुग्ण आल्याने येथे संसर्ग वाढण्याबाबत नागरिकात शंका व्यक्त होत आहेत . शिवाय जिल्हा बंदी तोडून रुग्ण धुळ्यात आणणेही योग्य नाही . मालेगावचे जिल्हा केंद्र नाशिक असल्याने हे रुग्ण नाशिकला पाठवावे , अशीही सूचना त्यांनी केली आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने