**गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मा. पालकमंत्री जयकुमार भाऊ आहे*"
**यांच्या हस्ते पोलीस** **विभागाच्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन**
दोडाईचा मुस्तफा शाह
दिनांक ३०/०३/२०२५ रोजी दोंडाईचा पोलीस ठाणे येथे १) दोंडाईचा पोलीस ठाणे करीता नूतन इमारतीचे पहिल्या टप्याचे मंजुर बांधकामाचे भुमीपुजन सोहळा व निवासस्थाने नुतनीकरण, २) पोलीस विभागास नव्याने प्राप्त ०७ स्कॉर्पीओ चारचाकी वाहने प्रदान सोहळा, ३) पोलीस ठाणे दोंडाईचा आवारात व्हॉलीबॉल मैदानाचे उद्घाटन, ४) अनुशोध अॅपचे (मिसिंग पर्सन शोधण्याचे अॅप) उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले.
पोलीस विभागाच्या विविध कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणुन मा. ना. श्री. जयकुमार रावल, पणन व राजशिष्ठाचार मंत्री तथा पालकमंत्री धुळे जिल्हा व मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे हे उपस्थित होते. दोंडाईचा पोलीस ठाणे करीता नुतन इमारतीचे पहिल्या टप्यातील १० शासकीय निवासस्थाने बांधकामाचे भुमीपुजन व ०८ निवास्थानांचे नुतनीकरणाचे उद्घाटन मा. ना. पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय धुळे जिल्हा पोलीस विभागास नव्याने ०७ स्कॉर्पीओ चारचाकी वाहने प्राप्त झाले सदर वाहनांचा लोकार्पन सोहळा मा. ना. पालकमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच पोलीस ठाणे दोंडाईचा आवारात नव्याने तयार करण्यात आलेले व्हॉलीबॉल मैदानाचे उद्घाटन व तद्नंतर अनुशोध अॅपचे उद्घाटन समारंभ मा. पालकमंत्री जिल्हा धुळे यांच्या हस्ते पार पडला.
सदर उद्घाटन समयी मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे यांनी प्रास्ताविक करुन मार्गदर्शन केले. तनंतर, मा. ना. श्री. जयकुमार रावल, पणन व राजशिष्ठाचार मंत्री तथा पालकमंत्री धुळे जिल्हा यांनी मोलाचे मार्गदर्शन करुन विविध कार्यक्रमांचे उद्घाटन केले.
सदर उद्घाटन समारंभास दोंडाईचा शहर व परीसरातील प्रतिष्ठीत नागरीक, नगरसेवक, सामाजीक कार्यकर्ते, महिला व मा. श्री. मनीष वाघ, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, दोंडाईचा, पोलीस विभागाचे मा.श्री. सुनिल गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपुर उपविभाग, शिरपुर, स्थानिक गुन्हे शाखेचे, श्रीराम पवार, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, श्रीकृष्ण पारधी, शिरपुर शहर पोलीस ठाण्याचे श्री. किशोरकुमार परदेशी, शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे श्री. जयपाल हिरे, नरडाणा पोलीस ठाण्याचे श्री. निलेश मोरे, थाळनेर पोलीस ठाण्याचे श्री. शत्रुघ्न पाटील, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे श्री. केदार, मोटार परीवहन विभाग, धुळेचे पोउपनि, रावसाहेब पाटील व अंमलदार तसेच दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व अंमलदार, होमगार्ड पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
