अरे किमान यांना तरी सोडा..
कर्णबधिर पिडीता कडून लाच घेताना खाजगी इसम अटकेत
धुळे प्रतिनिधी - सध्या सरकारी कामात लाच घेणे हा एक शिष्टाचार झाला आहे. मात्र कोणत्या प्रकरणात लाच घ्यावी याला देखील काही नैतिकता असते. अर्थात हे लाच घेणे समर्थनीय नाही मात्र लाच घेताना देखील लाज सांभाळले पाहिजे एवढीच रास्ता अपेक्षा. दिव्यांग बांधवांकडून देखील लाज घेणे म्हणजे खरोखर हा लाज सोडण्याच्या प्रकार आहे. असाच प्रकार धुळे जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून समोर आला आहे.
तक्रारदार यांच्या तक्रारीवरून सापळा रचून कारवाई केली असता आरोपी कमलाकर उत्तम महानोर वय 39 रा. खंडेराव मंदिराजवळ शेलारवाडी चित्तोड रोड धुळे.( खाजगी इसम ) यांना 4,500 रुपयांची लाच घेताना रंगीहात अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे नातेवाईक पीडित हे कर्णबधीर आहेत पीडित यांचे कर्णबधिर प्रमाणपत्र मिळण्याकरता ऑनलाइन अर्ज केला होता व त्याप्रमाणे महाविद्यालयात जाऊन तपासणी केली त्यानंतर तक्रारदार व पीडित हे कर्णबधिर चे प्रमाणपत्राच्या चौकशी करता वैद्यकीय भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात गेले असता कर्णबधिर प्रमाणपत्र मिळवून देण्याकरता वैद्यकीय अधिकारी यांच्या नावे आरोपी यांनी 5000/- रुपयाची मागणी केली होती बाबत तक्रारदार यांनी तक्रार दिल्याने त्याची त्यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपी यांनी पंचासमक्ष. 5,000/-रुपयाची मागणी करून तडजोड अंतिम 4500/- रुपये स्वीकारताना मिळून आले आहे. आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत आरोपीची घर झडती निरंक आहे. शिवाय या विभागातील कोणताही लोकसेवक यात समाविष्ट नाही असे देखील प्राथमिक चौकशीत दिसून येत आहे.
सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सचिन साळुंखे
पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि,धुळे , यांच्या मार्गदर्शनाने पंकज शिंदे , पोलीस निरीक्षक , लाप्रवि धुळे , पो हवा/ राजन कदम, प्रविण मोरे, संतोष पावरा , मकरंद पाटील, प्रविण पाटील यांच्या पथकाने केली आहे.
